• Download App
    प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट बसवणार, केंद्रीय मंत्री गडकरींची विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांशी बैठक । Union Minister Nitin Gadkari Meeting With All Districts Gaurdian Minister Of Vidarbha On Current Covid Situation and Oxygen Crisis

    विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांना आणि फडणवीसांना गडकरींनी आणले एकत्र! एकत्रित मिळून लढणार

    Union Minister Nitin Gadkari : या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नितीन राऊत, एकनाथ शिंदे, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, शंभुराजे देसाई, विश्वजीत कदम, बच्चू कडू तसेच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. Union Minister Nitin Gadkari Meeting With All Districts Guardian Minister Of Vidarbha On Current Covid Situation and Oxygen Crisis


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवतोय. यावर मात करण्यासाठी केंद्राने शर्थीने प्रयत्न चालवले आहेत. त्या दृष्टीनेच ऑक्सिजन एक्स्प्रेस, रेमडेसिव्हिरच्या उत्पादनात वाढ व नवनवीन जंबो कोविड सेंटर उभारणे सुरू आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज बैठक घेतली. या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, नागपूर व अमरावतीचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

    प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प

    केंद्राने व राज्याने मिळून काम करण्याची गरज व्यक्त करत या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याशिवाय ऑक्सिजनच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यावरही चर्चा केली आहे. विशेष म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पीएम केअर्स फंडमधून देशभरात 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे जाहीर केले आहे.

    रेमडेसिव्हिरचे जिल्हानिहाय वितरण

    याशिवाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व व्हेंटिलेटर यांच्या जिल्हानिहाय वितरणावर चर्चा करण्यात आली. वर्ध्यामध्ये पुढच्या आठवड्यात तयार होणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स सर्व जिल्ह्यांना वितरीत करण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नितीन राऊत, एकनाथ शिंदे, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, शंभुराजे देसाई, विश्वजीत कदम, बच्चू कडू तसेच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

    Union Minister Nitin Gadkari Meeting With All Districts Gaurdian Minister Of Vidarbha On Current Covid Situation and Oxygen Crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज