• Download App
    केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध 5 ठिकाणी गुन्हे दाखल, अटकेची शक्यता, मुख्यमंत्री ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य । Union Minister Narayan Rane Arrest Order by Nashik Police for derogatory comment On CM Uddhav Thackeray

    केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध 5 ठिकाणी गुन्हे दाखल, नाशिक पोलीस अटकेसाठी रवाना, मुख्यमंत्री ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य

    Union Minister Narayan Rane : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकणात आलेलेकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. नारायण राणेंविरोधात रायगड, महाड, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे असे पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Union Minister Narayan Rane Arrest Order by Nashik Police for derogatory comment On CM Uddhav Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकणात आलेलेकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. नारायण राणेंविरोधात रायगड, महाड, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे असे पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    अटकेची माहिती उपराष्ट्रपतींना कळवणार!

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. दुसरीकडे, आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

    सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे अटक केल्यानंतर उपराष्ट्रपतींना कळवलं जावं. अटकेची माहिती भारत सरकारला द्यावी. कारवाईवेळी राजशिष्टाचाराचं पालन करा, हक्कभंगाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

    नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

    रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

    Union Minister Narayan Rane Arrest Order by Nashik Police for derogatory comment On CM Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले!!

    देवाभाऊंच्या पक्षाचा वरून पहिला नंबर, तर शरद पवारांच्या पक्षाचा खालून पहिला नंबर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोशल मीडियावर सामसूम!!

    महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; 129 नगराध्यक्ष, 3325 नगरसेवक निवडून आणून रेकॉर्ड!!