• Download App
    बाबरी मशीद पतनाच्या वेळचे केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन। Union Home Secretary Dr. Babri Masjid at the time of the fall. Death of Madhav Godbole

    बाबरी मशीद पतनाच्या वेळचे केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

    प्रतिनिधी

    पुणे :  सन 1992 मध्ये बाबरी मशीद पतनाच्या वेळी केंद्रीय गृहसचिव पदावर कार्यरत असणारे डॉ. माधव गोडबोले यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशासकीय कारकीर्दीसोबतच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोडबोले यांनी वयाच्या 89 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शासनाने कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करू नये या भूमिकेचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. Union Home Secretary Dr. Babri Masjid at the time of the fall. Death of Madhav Godbole

    माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठीही गोडबोले यांचे लेखन मार्गदर्शक ठरले आहे.



    माधव गोडबोले यांची कारकीर्द

    डॉ. माधव गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. आणि पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशाच्या समकालीन राजकीय इतिहासाला वळण देणाऱ्या बाबरी मशीद पतनाच्या वेळी गोडबोले हे केंद्रीय गृहसचिव पदावर कार्यरत होते.

    तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तसेच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तसेच त्याअगोदर डॉ. गोडबोले यांनी महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही काम केले होते.

    Union Home Secretary Dr. Babri Masjid at the time of the fall. Death of Madhav Godbole

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस