विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रिया बापट आणि उमेश कामत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी. या जोडीची प्रत्येक कुठेही एक वाचकांसाठी बातमी ठरते. गेली अनेक वर्ष प्रिया आणि उमेश सिनेमा सिरीयल नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.Umesh kamat priya bapat coming Marathi drama .
प्रिया आणि उमेश सोशल मीडियाच्या माध्यमातूनं कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.काही वर्षांपूर्वी त्यांची आणखी काय हवं नावाची सीरिज ओटीटीवर आली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ओटीटी विश्वातही या दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं आहे.
प्रिया बापट हीची द सिटी ऑफ ड्रीम ही वेब सिरीज तर प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. दोन्ही सेलिब्रेटींनी त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे त्या दोघांची जर-तरची गोष्ट….दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची खूप इच्छा होती. मात्र आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण एका दशकानंतर हे क्युट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र झळकणार आहे. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव ‘जर तर ची गोष्ट’ असे आहे.
Umesh kamat priya bapat coming Marathi drama .
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्यासाठी जमले होते 26 पक्ष, आज NDAच्या बैठकीला 38 पक्षांचा सहभाग
- संशयाचे पडळ घेऊन शरद पवार आज बंगलोरच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत!!
- एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही
- दिल्लीतील अधिकारांच्या लढाईवर घटनापीठ करणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नायब राज्यपाल- मुख्यमंत्र्यांना मिळून काम करण्याचा सल्ला