Tuesday, 6 May 2025
  • Download App
    उद्धव ठाकरे यांचे "भावी सहकारी"; संजय राऊत पाठीत खंजीर खुपसण्याचे उदाहरण नेमके कोणाला देत आहेत??। Uddhav Thackeray's "future colleague"; Who exactly is Sanjay Raut giving the example of stabbing in the back?

    उद्धव ठाकरे यांचे “भावी सहकारी”; संजय राऊत पाठीत खंजीर खुपसण्याचे उदाहरण नेमके कोणाला देत आहेत??

    नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये भाषणादरम्यान उल्लेख केलेल्या “माझे भावी सहकारी” या वक्तव्यावरची राजकीय चर्चा अजून थांबायला तयार नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्या विधानाला हवा दिली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील या भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिवसेनेतून तर संभाजीनगरचे मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थीची ऑफरही देऊन टाकली. Uddhav Thackeray’s “future colleague”; Who exactly is Sanjay Raut giving the example of stabbing in the back?

    पण तरीही शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत एकटेच मुख्यमंत्री यांच्या विधानाच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. ते तावातावाने मुख्यमंत्री यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर प्रत्युत्तर देत आहेत.



    शिवसेना भवन फोडणाऱ्या पक्षाशी हातमिळवणी नाही, असे ते म्हणत आहेत. पण त्याच वेळी ते शिवसेना कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही याची आठवणही करून देत आहेत. ती नेमकी कोणाला आठवण करून देत आहेत…?? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

    शिवाय शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांची हातमिळवणी नाही हे तर खरेच. पण शिवसेना पक्ष फोडणाऱ्यांशी हातमिळवणी करून शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर बसल्याचे ते विसरत आहेत.

    खंजीर खुपसण्याची भाषा लागू होणारे आणि नुसते शिवसेनाभवन नव्हे, तर 1992 मध्ये छगन भुजबळ यांच्यासकट १८ शिवसेना आमदार फोडणारे नेते एकच आहे यांच्याकडे तर संजय राऊत यांचा अंगुलीनिर्देश नाही ना, अशीही चर्चा आहे.

    अर्थात, संजय राऊत यांनी खंजीर खुपसण्याची याची भाषा फक्त आजच केली आहे असे नाही. या आधी देखील त्यांनी शरद पवारांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला याचे एक तरी उदाहरण द्या…!!, असे सांगून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाच्या पाठीत खंजीर नेमका कोणी खुपसला…!!, हे स्पष्टपणे सूचित केले होते. त्यामुळेच संजय राऊत यांच्या खंजीर खुपसणे या भाषेविषयी शंका निर्माण होते. आणि तो इशारा भाजप नेत्यांसाठी नसून अन्य नेत्यांसाठी आहे असे स्पष्ट दिसते.

    त्याच बरोबर शिवसेना कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही हे ठीक आहे. पण मग शिवसेनेला कोणाकडून पाठीत खंजीर खुपसण्याची भीती वाटते आहे…??, याविषयी देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्र्यांनी “माझे भावी सहकारी” असा जाहीरपणे उल्लेख करून खंजीर खूपसणाऱ्यांना इशारा दिला आहे, असेही बोलले जात आहे. किंबहुना शिवसेना आमदारांमधूनच ही चर्चा मूळ धरू लागली आहे.

    Uddhav Thackeray’s “future colleague”; Who exactly is Sanjay Raut giving the example of stabbing in the back?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस