• Download App
    उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल : म्हणाले- लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, सरकारे पाडण्यासाठी आहेत! Uddhav Thackeray's attack on BJP He said- You don't have money to run the army, you have to overthrow the government!

    उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल : म्हणाले- लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, सरकारे पाडण्यासाठी आहेत!

    प्रतिनिधी

    मुंबई : लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी तुमच्याकडे पैसा नाही. पण राज्या-राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. हे कोणते स्वातंत्र्य आहे, असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. Uddhav Thackeray’s attack on BJP He said- You don’t have money to run the army, you have to overthrow the government!

    ज्यांच्यामुळे तिरंग्याचे रक्षण होते, ज्यांच्यामुळे घरावर आणि डीपीवर तिरंगा लावू शकतो, त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे. घरात बसून बेंबीच्या देठापासून भारत माता की जय म्हटल्याने शत्रू पळणार नाहीत. उद्या माझ्या घरावर तिरंगा लावलेला बघून चीन काय पळून जाणार आहे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.


    Raj – Uddhav : कोण असली – कोण नकली??; गर्दीच्या भांडणात घरातल्या हिंदुत्वातच जुंपली!!


    मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्ताने ऑनलाइन संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते. डीपीवर तिरंगा टाकायचाच. आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. सोशल मीडिया जोरात आहे. पण जे चाललंय ते सोसेल का? स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी करण्यासाठी सीमेवर जे उभे आहेत तिथे लष्करात कपात करणार आहात.

    शस्त्र घेण्यासाठी माणसे कमी करणार असाल तर शस्त्र कुणाच्या हातात देणार? चीन, रशिया अमेरिकेने तरी आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचे माझ्या वाचनात नाही. लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. पण राज्या-राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, हे कोणतं स्वातंत्र्य आहे, असा सवालही ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना विचारला.

    Uddhav Thackeray’s attack on BJP He said- You don’t have money to run the army, you have to overthrow the government!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस