• Download App
    उद्धव ठाकरे करणार नाहीत, मोदीजी, तुम्हीच करा!!; राज ठाकरेंचे साकडे Uddhav Thackeray will not do it, Modiji, you do it !!; Raj Thackeray's Sakade

    औरंगाबादचे संभाजीनगर : उद्धव ठाकरे करणार नाहीत, मोदीजी, तुम्हीच करा!!; राज ठाकरेंचे साकडे

    प्रतिनिधी

    पुणे : उद्धव ठाकरे हे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणार नाहीत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हीच करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत केले Uddhav Thackeray will not do it, Modiji, you do it !!; Raj Thackeray’s Sakade

    राज ठाकरे यांनी आपल्या पुणे येथे झालेल्या सभेत टीका करणा-या सर्वांवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच अनेक मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे.



    – केल्या तीन मागण्या

    माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे. त्यांनी लवकरात लवकपर समान नागरी कायदा आणावा, या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अजून एक कायदा आणावा आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करुन टाका, अशा तीन मागण्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत. ही मागणी पूर्ण करुन यांचं राजकारण मोडून काढा, असे आवाहनही त्यांनी केले.

    – राजकारणासाठी एमआयएमला पोसलं

    यांनी यांच्या राजकारणासाठी एमआयएमला मोठा केला. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमकडून हिंदू विरोधी भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. पण यांच्या एक लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवत आहोत. आणि म्हणता म्हणता तिथे एमआयएमचा खासदार होऊन, या निजामाच्या औलादी महाराष्ट्रात येऊ लागल्या. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

    Uddhav Thackeray will not do it, Modiji, you do it !!; Raj Thackeray’s Sakade

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस