• Download App
    स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील, उद्धव ठाकरेंचा इशारा काँग्रेसला की भाजपला? । Uddhav Thackeray Warns Congress and BJP For Elections On their Own in Shivsena 55th Anniversary

    स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील, उद्धव ठाकरेंचा इशारा काँग्रेसला की भाजपला?

    Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 55व्या स्थापना दिनानिमित्त शिवसैनिकांना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संबोधित करताना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील वाटेकरी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते एकट्याने निवडणुका लढण्याची घोषणा करत आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वत:च्या बळावर निवडणुका लढण्याविषयी बोललो तर लोक जोडे हाणतील. एवढेच नाही ठाकरे असेही म्हणाले की, तलवार उचलायची ताकद नाही अन् स्वबळाची भाषा करत आहेत. काँग्रेस पक्षावर उद्धव ठाकरे यांच्या या टीकेमुळे महाविकास आघाडीत निश्चित वाद सुरू होण्याची शक्यता आहे. Uddhav Thackeray Warns Congress and BJP For Elections On their Own in Shivsena 55th Anniversary


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेच्या 55व्या स्थापना दिनानिमित्त शिवसैनिकांना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संबोधित करताना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील वाटेकरी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते एकट्याने निवडणुका लढण्याची घोषणा करत आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वत:च्या बळावर निवडणुका लढण्याविषयी बोललो तर लोक जोडे हाणतील. एवढेच नाही ठाकरे असेही म्हणाले की, तलवार उचलायची ताकद नाही अन् स्वबळाची भाषा करत आहेत. काँग्रेस पक्षावर उद्धव ठाकरे यांच्या या टीकेमुळे महाविकास आघाडीत निश्चित वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

    लोक जोड्याने हाणतील

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही दिवसांपासून सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे सत्तेतील वाटेकरी काँग्रेसला नाव न घेता धारेवर धरले आहे. ठाकरे म्हणाले, ‘अनेकांचा आज रोजगार गेला. काय होणार ही चिंता आहे. आता निवडणुकाही नाहीत. अशावेळी कोणी स्वबळाचा नारा देणार असेल तर लोक जोडे हाणतील. ते म्हणतील, माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग. तू स्वबळ सांगणार आणि आम्हाला भिकेला लावणार. कोरोनातही राजकारण होत असेल तर देश अस्वस्थतेकडे जाईल,’ असेही ते म्हणाले.

    घराबाहेर पडणार

    उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाची पालखीही वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म लोकांच्या न्याय हक्कांसाठी झाला आहे. विकृत राजकारण करत राहिलो तर आपलं आणि देशाचं काही खरं नाही. मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. कोरोना काळातही राजकारण करणे हे विकृतीकरण आहे, अशा कानपिचक्या त्यांनी भाजपला दिल्या. मी घराबाहेर पडत नाही अशी टीका होते. घराबाहेर न पडता इतके काम होत असेल तर बाहेर पडल्यास काय होईल? तेही मी करणार आहे,’ असेही ते म्हणाले.

    शिवसेना प्रमुखांनी आम्हाला स्वबळ दिले

    उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वबळ, आत्मबळ तर आमच्याकडे आहेच. शिवसेनाप्रमुखांनी ते आम्हाला दिले. आम्हीही स्वबळावर लढू पण आमचा स्वबळाचा अर्थ केवळ निवडणूक अन् सत्ताप्राप्तीसाठी नाही. लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी तलवार उचलण्याची ताकद हे आमचे स्वबळ आहे.

    सेना भवनासमोरील राड्याबाबत

    शिवसेना भवनसमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याचा उल्लेख न करता ठाकरे म्हणाले की, कोणी फटकन आवाज काढला तर तुम्ही काडकन आवाज काढला पाहिजे, या शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचे मेसेज फिरताहेत. रक्तपात करणे हा आमचा गुणधर्म नाही. रक्तदान करणारे शिवसैनिक ही आमची ओळख आहे.

    ममतांची स्तुती

    उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिला. हिंदुत्व ही काही कंपनी नाही की कोण्या एकाचे पेटंट नाही. आमच्यासाठी आधी देश महत्त्वाचा आहे, पण प्रादेशिक अस्मिताही तेवढीच महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालच्या मतदारांनी, ममता बॅनर्जींनी हीच अस्मिता दाखवून दिली, असेही ते म्हणाले.

    Uddhav Thackeray Warns Congress and BJP For Elections On their Own in Shivsena 55th Anniversary

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!