विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवशक्ती – भीमशक्ती – लहूशक्ती कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच केले आहे. पण उद्धव ठाकरेंच्या मनातली ही महिला मुख्यमंत्री नेमकी आहे तरी कोण??, असा प्रश्न त्या निमित्ताने तयार झाला आहे. Uddhav Thackeray wants to make woman chief minister in maharashtra, but who will be she
उद्धव ठाकरे हे काल 30 नोव्हेंबर 2022 रोजी वांद्र्याच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंती कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
महाराष्ट्रात शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्ती एकत्र आल्यानंतर आपल्याला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आपण एकत्र रस्त्यावर आलो तर आपण महाराष्ट्राचे सगळे चित्र बदलून टाकू, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे मुंबई आणि अन्य महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने युती करणार अशा चर्चा जोरावर असताना स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्तीचा उल्लेख केल्याने आधीच महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा असताना उद्धव ठाकरेंनी त्यापुढे जाऊन महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करायची आहे, असा उल्लेख केल्याने या चर्चेला वेगळाच राजकीय तडका मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेली महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होणार तरी कोण??, अशी चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे स्पर्धेत?
कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आधीच सुप्रिया सुळे यांच्या रूपाने एक महत्त्वाचा स्पर्धक अस्तित्वात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून 20 वर्षे सत्तेवर असली, तरी राष्ट्रवादीचा एकही नेता अद्याप मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसला आपला मुख्यमंत्री करायचाच असेल, तर त्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर असेल, अशी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा असते.
अशावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती आणि लहूशक्ती एकत्र आणून महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याची करण्याचा मनसूबा बोलून दाखवणे याला विशेष महत्त्व आहे. पण उद्धव ठाकरेंच्या मनातली महिला मुख्यमंत्री नेमकी कोण??, ही चर्चा राजकीय वर्तुळात जोर पकडू लागली आहे.
उद्धवजींच्या मनात रश्मी ठाकरे??
शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे बाहेर पडण्याच्या दरम्यान अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना अशीच एक सूचना केली होती. आपण आजारपणामुळे घराबाहेर बाहेर पडू शकत नाही. सबब आपण रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील, असे ते म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे यांनी आपली सत्ता गेल्यानंतर अब्दुल सत्तारांची ही सूचना मनावर घेतली आहे का??, अशीही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
Uddhav Thackeray wants to make woman chief minister in maharashtra, but who will be she
महत्वाच्या बातम्या
- अमित शाह, राजनाथ सिंह, फडणवीसांची पावले समान नागरी कायद्याच्या दिशेने
- धान्यापासून दारू ते ताडी वर बंदी नको, व्हाया सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री; एक पुरोगामी प्रवास
- पुणे, सातारा, कोल्हापूरात नोकरीची संधी; 7500 रिक्त पदांसाठी भरती; वाचा तपशील
- केंद्र सरकारची जहाँ जुग्गी वहाँ मकान योजना; दिल्लीतील 10 लाख झोपडपट्टीवासीय होणार लाभार्थी