• Download App
    सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, पण भाजप विरुद्ध एकत्र लढू; मालेगावच्या सभेत राहुल गांधींना इशारा देताना उद्धव ठाकरेंची तारेवरची कसरतUddhav Thackeray tried to make tight rope walking over savarkar insult issue, warned rahul Gandhi but with caution

    सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, पण भाजप विरुद्ध एकत्र लढू; मालेगावच्या सभेत राहुल गांधींना इशारा देताना उद्धव ठाकरेंची तारेवरची कसरत

    प्रतिनिधी

    नाशिक : राहुल गांधी भाजप विरुद्ध आपण एकत्र लढू, पण तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका तो आम्ही सहन करणार नाही, असे सांगत मालेगावच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून तारेवरची कसरत करावी लागली. Uddhav Thackeray tried to make tight rope walking over savarkar insult issue, warned rahul Gandhi but with caution

    राहुल गांधींनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला अपमान हा महाराष्ट्राचा देशावर चर्चेचा विषय झाला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या मुद्द्यावरून कालच विधानसभेत आणि विधानसभेत बाहेर ठाकरे गटावर जोरदार तोफ डागली होती.

    एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यालाच प्रत्युत्तर देताना आजच्या मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांना तारेवरची कसरत करावी लागली. एकाच वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी आपण एकत्र लढू पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला. या सभेत उद्धव ठाकरेंनी सावरकरांनी केलेल्या त्यागाचे सविस्तर वर्णन केले. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर भगूरच्या सावरकर वाड्यात लहानपणी गेल्याची आठवणही सांगितली.

    सावरकरांनी केलेला त्याग, भोगलेले अनन्वीत कष्ट हे पाहता सावरकरांनी फाशी गेलेल्या क्रांतिकारकांनी इतकेच मोलाचे योगदान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिले हे मान्य करावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान करू नये. भाजप विरोधातील लढाईचे लक्ष दुसरीकडे खेचून नेऊ नये. तसा प्रयत्न काही लोक करतात. त्याला राहुल गांधींनी बळी पडू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. पण हे वक्तव्य करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली हे मात्र मालेगावच्या सभेत स्पष्ट दिसून आले.

    बाकी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात फारसे नवे मुद्दे नव्हते. मिंधे गट, माझ्या बापाचे नाव वगैरे रुटीन शब्द उद्धव ठाकरेंनी या भाषणात वापरले.

    भाजपला त्यांनी यावेळी वेगळे आव्हान दिले. महाराष्ट्र भाजपने आता हे जाहीर करावे तिथे मोठा पक्ष असूनही मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदारांचा भाजपच्या आमदाराने केलेल्या निरमा पावडरचा उल्लेख केला.

    या सभेत उद्धव ठाकरे हे मालेगाव विधानसभेत दादा भुसे यांच्या विरुद्ध अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा मात्र उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली नाही. मालेगावच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात भाऊसाहेब हिरे यांच्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी एकत्र लढ्यात भाग घेतल्याचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केला.

    Uddhav Thackeray tried to make tight rope walking over savarkar insult issue, warned rahul Gandhi but with caution

     

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!