प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनी षण्मुखानंद हॉलमध्ये आपल्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांवर टीका केली. पण त्याच वेळी ज्याला जायचे त्यांनी तिकडे जा, असे सांगून बाहेरच्या दरवाजाकडे बोट दाखवले. Uddhav thackeray showed the out door to shivsainiks on 57 anniversary
उद्धव ठाकरे यांच्या बाकीच्या भाषणात नेहमीचेच जुने मुद्दे होते. गद्दार – खोके या शब्दांना त्यांनी आज गर्दी आणि गारदी असे शब्दही जोडले. इकडे निष्ठावंतांची गर्दी आहे आणि तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गारदी जमले आहेत. इथे बसलेले सगळेच उद्धव ठाकरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी निष्ठेचे, स्वाभिमानाचा बियाणं पेरले आहे. पण जे बिकाऊ आहेत, त्यांनी जरूर जावे. ज्यांना जायचे त्यांनी जावे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वतःच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायला दरवाजा मोकळा करून दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले :
- मिंधे म्हणतात की नरेंद्र मोदी म्हणजे सूर्य… त्यांच्यावर थूंकू नका, अरे मग तुमचा सूर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे का प्रकाश पाडत नाही?
- नरेंद्र मोदींनी जर कोरोनाची लस बनवली असेल तर ते ब्रह्मांडही चालवतील.
- इकडे निष्ठावंतांची गर्दी जमली आहे. तिकडे गारदी जमलेत. पूर्वी पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करायला गारदी गोळा केले जायचे. तसेच गारदी आज तिकडे गोळा झाले आहेत.
- मणिपूर पेटलं असताना आपले पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे बोलल्यानंतर नवगुलाम बोलले, सूर्यावरती थूंकू नका. मग ते जर सूर्य असतील तर मणिपूरमध्ये प्रकाश का पाडत नाही? मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. एका रिटायर्ड अधिकाऱ्याने सांगितलं की मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळलं जात असताना भाजपचे नेते तिकडे जात नाहीत.
- काल देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील हास्यजत्रेचा प्रयोग केला. ते म्हणाले, कोविडची लस मोदीजींनी तयार केली. मग बाकीच्या कंपन्या काय गवत उपटत बसल्या होत्या का? त्यांच्या हास्यजत्रेत अवली सगळीच आहेत, लव्हली कुणीच नाही. याला जनता कावली आहे. मोदी हे विश्वगुरूंचे विश्वगुरू… लस त्यांनी बनवली असली तर नक्कीच ब्रह्मांडही चालवतील.
- हिंमत असेल तर देशांचे शत्रू संपवा. तुमचे राजकारणातले शत्रू कशाला संपवताय?
- ज्याला जायचं तर त्याने जावं…
- जे भाडोत्री किंवा बिकाऊ असतील त्यांना घेऊन जायचं तर जा. कारण रोज फोन चालू आहेत…काय करता या ना. चांगलं स्वाभिमानाचं, जिद्दीचं, निष्ठेचं हे शिवसेनाप्रमुखांनी दिलेलं बियाणं आहे. हा उद्धव ठाकरे एकटा नाही तर समोर बसलेले सगळे उद्धव ठाकरे आहेत. पीक कापून नेलंय मात्र शेती आमच्याकडे आहे.
Uddhav thackeray showed the out door to shivsainiks on 57 anniversary
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!