• Download App
    Uddhav Thackeray Shivsena MPs : शिवसेनेला धोका राष्ट्रवादी - एमआयएम आघाडीचा; उद्धव ठाकरेंचा निशाणा भाजपवर!! । Uddhav Thackeray Shivsena MPs: Danger to Shiv Sena NCP - MIM front; Uddhav Thackeray's target on BJP !!

    Uddhav Thackeray Shivsena MPs : शिवसेनेला धोका राष्ट्रवादी – एमआयएम आघाडीचा; उद्धव ठाकरेंचा निशाणा भाजपवर!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे नेते विविध वक्तव्ये करून या आघाडीच्या चर्चेला जोरदार हवा देत आहेत. पण दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र भाजपवर निशाणा साधत असताना दिसत आहेत. आज घरात राहूनच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची जो ऑनलाइन संवाद साधला त्यातले खरे राजकीय इंगित वेगळे आहे. Uddhav Thackeray Shivsena MPs: Danger to Shiv Sena NCP – MIM front; Uddhav Thackeray’s target on BJP !!

    -“खरा फटका शिवसेनेलाच

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांची आघाडी झाली तर त्याचा फटका खऱ्या अर्थाने मराठवाड्यात आणि मुंबई परिसरातल्या काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेला बसणार आहे. कारण शिवसेनेची संघटनात्मक बांधणी येथे एमआयएम या पक्षाच्या बांधणीच्या विरोधात आहे. अशा स्थितीत एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे उघडपणे अथवा छुप्या पद्धतीने एकत्र येण्याचा राजकीय धोका सर्वाधिक शिवसेनेला वाटतो आहे. या उघड अथवा छुप्या आघाडीचा फटका निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेला बसणार आहे.

    – राजकीय कोंडी

    उद्धव ठाकरे यांच्या हे लक्षात येऊन देखील ते सध्याच्या “राजकीय कंपलशन्स”मुळे राष्ट्रवादीवर थेट टीका न करता भाजपवर शरसंधान साधताना दिसत आहेत. शिवसेनेच्या आजच्या सर्व खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना मराठवाडा आणि विदर्भात लक्ष केंद्रित करायला सांगितल्याचे हे खरे राजकीय इंगित आहे.



    – घोटाळ्यांकडे दुर्लक्ष

    शिवसेनेत एकीकडे यशवंत जाधव, अनिल परब, आदींचे हजारो कोटींचे घोटाळे बाहेर येत असताना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना मराठवाडा आणि विदर्भातील लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.

    – मराठवाड्याकडे लक्ष

    उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्द्यापासून ते एमआयएम पक्षाशी आघाडी करण्यापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे. केंद्रीय तपास संस्था राजकीय हेतूनेच आपल्या मागे ससेमिरा लावत असल्याचे आरोप त्यांनी पुन्हा एकदा केले. पण त्या आरोपांकडे आणि कोर्टाने दिलेल्या विविध आदेशांकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना जिथे शिवसेना कमकुवत आहे, त्या मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.

    औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्या एमआयएम पक्षाशी आघाडी करणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने आम्हाला शिकवू नये. भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

    – खासदारांना राजकीय टार्गेट

    एमआयएम पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता असून मराठवाड्यात आणि विदर्भात तसेच मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना मराठवाडा आणि विदर्भात लक्ष केंद्रित करण्याचे आदेश काढून त्यांना एक राजकीय टार्गेट देऊन ठेवले आहे.

    Uddhav Thackeray Shivsena MPs: Danger to Shiv Sena NCP – MIM front; Uddhav Thackeray’s target on BJP !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस