• Download App
    उद्धव ठाकरे 'घर कोंबडा'; नितेश राणे यांचे 'कोंबडी चोर' पोस्टरवर जोरदार प्रत्युत्तर|Uddhav Thackeray Is 'Home Cock'; Nitesh Rane Strong response to 'Cock Thief' poster of Shivsena

    उद्धव ठाकरे ‘घर कोंबडा’; नितेश राणे यांचे ‘कोंबडी चोर’ पोस्टरवर जोरदार प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था

    चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. दुसरीकडे नितेश राणे यांनी ‘कोंबडी चोर ‘ या शिवसेनेच्या पोस्टरला जोरदार प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांना ‘घर कोंबडा’ ,असे म्हंटले आहे.Uddhav Thackeray Is ‘Home Cock’; Nitesh Rane Strong response to ‘Cock Thief’ poster of Shivsena

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापले आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली.



    शिवेसेनेने नारायण राणे यांचा ‘कोंबडी चोर ‘असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी हे बॅनर काढून टाकले आहेत. शिवसेनेचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे.

    यामध्ये नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरकोंबडा असा उल्लेख करणारा फोटो ट्विटर शेअर केला आहे. तसंच यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले.

    नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असं सूचक विधान राणे यांनी केले आहे.

    Uddhav Thackeray Is ‘Home Cock’; Nitesh Rane Strong response to ‘Cock Thief’ poster of Shivsena

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस