प्रतिनिधी
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेनेतील शिंदे गटाच्या अवैधतेवर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आज जोरदार युक्तिवाद केले, तर शिंदे गटाच्या 16 आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा नसलेला अधिकार, एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख नसणे, त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथच अवैध ठरवणे, त्या वेळचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचे राजकारण आदी मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी शिंदे गट आणि त्यांच्या सगळ्या राजकीय कारवाया कायद्याच्या कसोटीवर अवैध असल्याचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला आहे. Uddhav Thackeray faction questions shinde Shivsena’s validity, but shinde Shivsena mulling organisational election
या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मात्र पक्षांतर्गत घटनेनुसार निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त शिवसेनाप्रमुख हे पदच वैध होते. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद अवैध आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाने आधी सुप्रीम कोर्टात केला आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या शिवसेना या पक्षाला मुख्य नेता अस्तित्वात नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड करून त्यांच्या पदाला कायद्याच्या दृष्टीने वैध ठरेल असे नाव देणे हे शिंदे गटापुढचे मोठे टास्क आहे. शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे.
मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार लवकरच या निवडणुका होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपुष्टात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाचा ताबा शिंदेंकडे आल्यामुळे शिवसेनेच्या घटनेनुसार या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (२१ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षाच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यात पक्षाची मालमत्ता, निधी आणि कार्यालये, यावर हक्क सांगण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्यासंदर्भात यावेळी रणनीती ठरवली जाईल.
प्रमुख नेत्याची होणार निवड
शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली जाणार आहे. घटनेनुसार या प्रमुख पदाला नाव काय द्यावे, यावर मुख्यत्वे चर्चा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य असल्याचा दावा आधीच शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केला आहे, तर शिवसेनेत मुख्य नेता असे पदच नसल्याचे उद्धव ठाकरेंचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष, अशा काही नावांचा विचार केला जात असल्याचे समजते.
या विषयांवर होणार चर्चा
कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबद्दल चर्चा होईल. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या नेत्यांची निवड केली जाईल. शिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘एबी फॉर्म’वर कुणाची सही असावी, यासंदर्भात ठराव संमत केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Uddhav Thackeray faction questions shinde Shivsena’s validity, but shinde Shivsena mulling organisational election
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
- तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी
- मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल
- कोशियारींच्या मुलाखतीतले कळीचे सवाल; उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा कोण??,आणि…