• Download App
    रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे - भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!! Uddhav Thackeray breaks NCP in ratnagiri district and targets eknath shinde, BJP and Election commission

    रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!

    प्रतिनिधी

    रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच महिन्यानंतर मातोश्री बाहेर पडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल ठेवले. ममता बॅनर्जी जशा विधानसभा निवडणुकीत भाजपवर तोंडसुख घेऊन काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी वगैरे पक्षांचे नेते फोडायच्या, तसेच उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये केले आहे. Uddhav Thackeray breaks NCP in ratnagiri district and targets eknath shinde, BJP and Election commission

    उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार कदम यांना आपल्या गटात प्रवेश देऊन रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे 40 आमदार भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार तोंडसुख घेतले आहे.


    Uddhav Thackeray Resigns : मविआ सरकारचा शेवट, जाणून घ्या ते 5 मोठे निर्णय ज्यांच्यामुळे लक्षात राहील ठाकरे सरकार


    शिवसेना हा पक्ष माझ्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे. तो निवडणूक आयोगाने स्थापन केला नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह चोर गटाला दिले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचवेळी जनतेने जर आपल्याला सांगितले तर आपण एका मिनिटात घरी जाऊ. वर्षा बंगला सोडला तेव्हा देखील मी सत्तेला शिकून राहिलो नव्हतो. तसेच जर जनतेने सांगितले तर मी पुन्हा घरी जाईन पण हा फैसला मी निवडणूक आयोग भाजप अथवा चोर गटावर सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.

    चोर गट म्हणजे रक्त पिणारा ढेकूण आहे त्याला चिरडायला फक्त एका बोटाची गरज आहे. आपल्याकडे तर संजय कदम यांच्या रूपाने आता मुलुख मैदान तोफ दाखल झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी संपूर्ण कोकणात पुन्हा एकदा आपला छत्रपती शिवरायांचा भगवा फडकेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

    राष्ट्रवादीतून ठाकरे गटात दाखल झालेले संजय कदम हे खेड मतदार संघात रामदास कदम यांच्या पुत्राविरुद्ध मशाल चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे दोन शिवसेना मधल्या या टकरीत मधल्या मध्ये कोकणातली राष्ट्रवादी फुटली आहे.

    उद्धव ठाकरे यांची ही सभा यशस्वी करण्यासाठी मुस्लिम सेवा संघाने प्रचंड मेहनत घेतली या सभेला मुस्लिमांनी हजर राहण्यासाठी त्यांनी पत्रक काढून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, तसेच सभेला 25 ते 30 हजार मुसलमान उपस्थित राहतील, अशी ग्वाही देखील दिली होती.

    Uddhav Thackeray breaks NCP in ratnagiri district and targets eknath shinde, BJP and Election commission

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस