विशेष प्रतिनिधी
नाशिक : अजित पवारांनी पक्ष सोबत नेल्यावर 83 वर्षीय योद्धा शरद पवारांनीही मैदानात उडी घेतली आहे. अजितदादांच्या बंडाला छगन भुजबळांची साथ पाहून पक्ष फुटल्यानंतरची पहिली सभा शरद पवारांनी येवल्यात ठेवली आहे. आज एकीकडे येवल्यात शरद पवारांची सभा होत असतानाच छगन भुजबळांनीही त्यावर उपाय काढला आहे. भुजबळांनीही आपली ताकद दाखवण्यासाठी नाशकात महाप्रचंड रॅलीचे आयोजन केले आहे.Uddhav Sena’s support for Pawar’s policy, the crowd will gather at Yeyla’s meeting; In response, Bhujbal held a massive rally in Nashka
शनिवारी दुपारी तीन वाजता येवला बाजार समितीच्या मैदानावर पवारांची सभा होणार आहे. स्थानिक नेते माणिकराव शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवारांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांची परतफेड म्हणून सभेला जास्तीत जास्त लोकांनी यावे अशी साद घातली जात आहे.
पवारनीतीला भुजबळांचे प्रत्युत्तर
पवारांची सभा सुरू होईल त्याच वेळी इकडे भुजबळ यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे, जेणेकरून टीव्ही चॅनलमध्ये शेजारी-शेजारी दोन्ही घडामोडी लोकांना दिसतील व त्यातून संभाव्य डॅमेज कंट्रोल करता येईल अशी रणनीती भुजबळ गटाने आखली आहे. दुपारी दोन वाजता भुजबळ इगतपुरीत येणार असून मुंबई-आग्रा महामार्गावर त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर पाथर्डी फाटा येथे त्यांचा भव्य सत्कार करून राष्ट्रवादी भवन येथे ते दाखल होणार आहेत. हा सर्व मार्ग साधारण पंचवीस किलोमीटरचा असून येथून जाणाऱ्या रॅलीचे लाइव्ह प्रक्षेपण होणार असल्यामुळे शरद पवारांना मिळणारी संभाव्य मीडिया स्क्रीन अर्धी करण्याचा प्रयत्न आहे.
पवारांच्या सभेत उद्धवसेनेचे योगदान
पवारांच्या सभेसाठी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी सूचना स्थानिक नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे आदी सभेत सहभागी होणार आहे. सभेच्या नियोजनातही उद्धवसेनेचे योगदान मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
Uddhav Sena’s support for Pawar’s policy, the crowd will gather at Yeyla’s meeting; In response, Bhujbal held a massive rally in Nashka
महत्वाच्या बातम्या
- 72 हुरें चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा; सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या
- बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप
- राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!
- Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!