भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे.Udayan Raje once again challenged the ED, saying, “If you want to take action, don’t come, don’t come.
विशेष प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ईडी , सीबीआय कडून विविध संस्था, व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे.
दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.तेव्हा खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, नेहमी मी सांगतो, ईडीने यावं.पण एका अटीवर.कारवाई करणार असाल तर या नाही तर येऊ नका. नाहीतर परत त्यांनी सांगितलं, त्यांचा फोन आला म्हणून सांगितलं. तसे असेल तर येऊ नका. येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. ईडी जेव्हा एखादी केस घेते त्याची कारवाई करताना सर्व मीडियासमोर झालं पाहिजे.
याआधी उदयनराजे भोसले काय म्हणाले होते
तसेच त्यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाजपालाही घरचा आहेर दिलाय. ‘जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केलंय, त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल, तर ईडीनं माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, अशा स्पष्ट शब्दात उदयनराजेंनी ईडीलाही सुनावलंय.
पुढे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हाला याबद्दल दुःख वाटत असेल, तर तुम्हीपण तसं करा, असंही त्यांनी म्हटलंय.
Udayan Raje once again challenged the ED, saying, “If you want to take action, don’t come.”
महत्त्वाच्या बातम्या
- पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही; धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद
- मोठे नेते – लहान नेते; शरद पवार – पंकजा मुंडे यांचे एकमेकांना टोले प्रतिटोले
- दसरा मेळाव्यात भाजपवर वाग्बाण, नंतर मुंबईत भाजप नगरसेवकांवर शिवसेनेची सेंधमारी
- ISI च्या मदतीनं एक नवी दहशतवादी संघटना स्थापन; भारतातील २०० लोक ‘हिट लिस्ट’मध्ये