विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दाखल झाले आहे. पन्हाळगड, नरसोबावाडी आणि शिरोळ या भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिळाली होती.
Two months after the flood, Central team has arrived in Kolhapur to study aftermath of flood.
पूर ओसरून गेल्यानंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पाहणी समिती आल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकर्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळत नसल्यामुळे यावेळी जहाल भूमिका घेतली होती.
सर्वप्रथम कोल्हापूर आणि कोल्हापूर नजीकच्या भागांमध्ये ही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये ही पाहणी केली जाईल आणि त्यानंतर मिरजेमध्ये पाहणी केली जाईल. सांगली शहर आणि डिग्रज या गावामध्ये अधिकारी स्थानिक लोकांसोबत चर्चा करतील. सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित चौधरी यांच्याकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीचे आढावा अधिकारी घेतील. तर तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक पूरग्रस्त भागांमधील लोकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र सरकरकडून निधीची मागणी करतील.
Two months after the flood, Central team has arrived in Kolhapur to study aftermath of flood
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।
- लखीमपूर खीरी : वरुण गांधींचे मुख्यमंत्री योगींना पत्र, सीबीआय चौकशी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई देण्याची मागणी
- राज्यसभेतील फक्त एका खासदाराची गेल्या सात सत्रांमध्ये 100% उपस्थिती, जाणून घ्या कोण आहेत हे नेते?
- BIG NEWS AURANGABAD : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमामि गंगे योजनेत औरंगाबादचा समावेश! खाम नदीला मिळणार नवसंजीवनी
- धनंजय मुंडेंच्या हस्ते ‘ई-ऊसतोड कल्याण ॲप ‘ बीड येथे लोकार्पण