वृत्तसंस्था
अहमदनगर: लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या दोन मेजर यांचे माणिकदौंडी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. गावात मिरवणूक त्यांचा काढून सत्कारही करण्यात आला. देशासाठी सेवा बजावून गावाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या वीरांचा गावकऱ्यांनी गौरव केला. two majors who retired from the army Warm welcome from Manikdaundi villagers
मेजर आजाद पठाण व मेजर दिलावर पठाण, अशी सेवानिवृत्त झालेल्या या भूमीपुत्रांची नावे आहेत. ते पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडीचे राहिवासी आहेत.
मेजर आजाद पठाण व मेजर दिलावर पठाण यांचे माणिकदौंडी ग्रामस्थांनी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिली. यावेळी गावातील या वेळी हिंदू मुस्लिम नागरिक व पाथर्डी तालुक्यातील सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.