• Download App
    दिव्यांगत्वावर मात करून दोन मित्र आत्मनिर्भर : कुणापुढेही हात न पसरता थाटला व्यवसाय । Two friends became self-reliant by overcoming handicap: started Own Business

    दिव्यांगत्वावर मात करून दोन मित्र आत्मनिर्भर : कुणापुढेही हात न पसरता थाटला व्यवसाय

    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दुय्यम आहे. काम करता येत नसल्याने दिव्यांग व्यक्ती एकतर घरी बसून राहतात. अथवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भीक मागतात. परंतु, यवतमाळ येथील दोन दिव्यांग युवकांनी भाजीपाला व्यवसाय सुरू करून स्वाभीमानाने जीवन जगण्याचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. Two friends became self-reliant by overcoming handicap: started Own Business

    समाधान रंगारी व छगन वाकोडे, अशी त्यांची नावे आहेत. छगन याच्या वडीलाचे दाते कॉलेज चौकात छोटेसे पंक्चर दुरुस्तीचे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला दोघांनी मिळून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. समाधान रंगारी हा एकूलता एक असून, आईसह यवतमाळात राहतो. आई धुणीभांडी करते. कुटुंबाला हातभार लावता यावा, यासाठी त्याने सुरुवातीला स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु, या व्यवसायात त्याला तोटा आला आणि त्याने हा व्यवसाय बंद केला. एक दिवस त्याची भेट मित्र छगनसोबत झाली. दोघांच्या चर्चा सुरू असताना भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.



    दिव्यांग असलो तरी स्वाभीमानाने जीवन जगायचे असे त्यांनी ठरविले. दोघेही सकाळी उठून तीन चाकी दुचाकीने भाजीमंडीत भाजीपाला खरेदी करण्यासाठी जातात. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत दोघेही भाजीपाला विक्री करतात आणि आलेला नफा वाटून घेतात. सुदृढ असणारे व्यक्ती विविध कारणांचा पाढा वाचत काम करीत नाहीत. अशांसाठी समाधान व छगन यांनी स्वाभीमानाने जगण्याचा निवडलेला पर्याय कौतुकास्पद असाच आहे.समाधान व छगन हे दोघेही दिव्यांग आहेत. त्यांना चालता येत नाही. त्यांच्याकडे दर्जेदार भाजीपाला राहत असल्याने खरेदी करतो. आपण सर्व सुदृढ आहोत. परंतु, त्यांनी सुरु केलेला व्यवसाय कौतुकास्पद आहे.

    Two friends became self-reliant by overcoming handicap: started Own Business

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस