• Download App
    धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद, आर्थिक संकटामुळे जळगावात 2 व्यावसायिकांच्या आत्महत्या । Two businessman commits suicide due to financial crisis because of lockdown in Jalgaon

    धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद, आर्थिक संकटामुळे जळगावात 2 व्यावसायिकांच्या आत्महत्या

    businessman commits suicide : कोरोना महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर दूरगामी परिणाम केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कामाला आलं, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे अशांचं इकडे आड आणि तिकडे विहीर असं जिणं झालं आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जळगावातील रेडिमेड कापड दुकान व सलून व्यावसायिकांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. Two businessman commits suicide due to financial crisis because of lockdown in Jalgaon


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : कोरोना महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर दूरगामी परिणाम केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कामाला आलं, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे अशांचं इकडे आड आणि तिकडे विहीर असं जिणं झालं आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जळगावातील रेडिमेड कापड दुकान व सलून व्यावसायिकांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

    रेडिमेड कापड व्यावसायिकाची आत्महत्या

    पहिली घटनेत संजय चिरमानी (वय 35) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. संजय यांचे फुले मार्केटमध्ये रेडिमेड कपडे विक्रीचा एका छोटासा गाडा होता. पण लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. यातच व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी सावकरांनी तगादा लावला. एकाच वेळी चहुबाजूंनी आलेल्या संकटामुळे संजय चिरमाणी यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

    सलून व्यावसायिकाची आत्महत्या

    लॉकडाऊनमुळे बिकट आर्थिक परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे जळगावातील सलून व्यवसायिक गजानन कडू वाघ (वय 35, रा. लक्ष्मीनगर) यांनी आत्महत्या केली आहे. गजानन वाघ लक्ष्मीनगरात पत्नी व दोन मुलांसह राहत होते. कोरोनामुळे सलून दुकानांवर निर्बंध लादलेले असल्याने त्यांच्या हाताला काम नव्हते. सुरुवातीच्या काळात मालकाकडून काही मदत मिळाली, परंतु नंतर तीही बंद झाली. लॉकडाऊन वाढतच गेले तसे वाघ यांची आर्थिक परिस्थिती आणखी ढासळली. त्यामुळे त्यांनी उसनवारी करून घरखर्च भागवण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती सुधारली नाही. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

    Two businessman commits suicide due to financial crisis because of lockdown in Jalgaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य