• Download App
    राजकीय भूमी परत मिळवण्यासाठी पवारांच्या टार्गेटवर पिंपरी चिंचवड मधले दोन भाजप आमदार |Two BJP MLAs from Pimpri Chinchwad on Pawar's target to regain political ground

    राजकीय भूमी परत मिळवण्यासाठी पवारांच्या टार्गेटवर पिंपरी चिंचवड मधले दोन भाजप आमदार

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने गमावलेली राजकीय भूमी परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आटोकाट प्रयत्न चालले असून त्या प्रयत्नांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पिंपरी चिंचवड मधल्या दोन भाजप आमदारांना टार्गेट करण्याचे काम सध्या सुरू आहे.Two BJP MLAs from Pimpri Chinchwad on Pawar’s target to regain political ground

    शरद पवारांचा पिंपरी-चिंचवडचा दौरा झाल्याबरोबर शहरातील भाजप नगरसेवकांमध्ये मोठी अस्वस्थता असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून देण्यात आल्या. भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केल्याची बातमी आली.



    एक नगरसेवकाने पत्र लिहिल्यानंतर संपूर्ण भाजप मध्ये अस्वस्थता असल्याच्या बातम्या देण्यात आल्या. यातून पवारांची भाजप अंतर्गत कशी सेंधमारी सुरू आहे हेच लक्षात येते.

    राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडची स्वतःची राजकीय भूमी गमावली आहे. तेथे गेल्या पाच वर्षात भाजपने आपला राजकीय जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी एकेकाळचे अजित पवार यांचे निष्ठावंत आमदार लक्ष्मण जगताप कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी करत असेल तर ते स्वाभाविक आहे. तसाच असंतोष आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात असल्याचे भासविण्यात येते आहे.

    आता फक्त एका नगरसेवकाने पत्र लिहिले आहे. परंतु हा असंतोष महापालिका निवडणुकीपर्यंत माध्यमांच्या द्वारे तापवत ठेवण्याचा आणि वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

    तुषार कामठे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून का असंतोष व्यक्त केला आहे त्यांनाच विचारले पाहिजे. कारण नगरसेवकांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्या आपल्याकडे केल्या जातात, असे भाजपचे महापालिकेतील गटनेते नामदेव ढाके यांनी स्पष्ट केले आहे.

    Two BJP MLAs from Pimpri Chinchwad on Pawar’s target to regain political ground

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!