• Download App
    तुळजापूर देवस्थानच्या दागिने व नाण्यांच्या गैरवापराबाबत कारवाई करण्याचे सीआयडीचे महाराष्ट्र सरकारला पत्र । Tuljalbhavani tempal gold and silver jewellery scam enquiry by CID and they send letter to Maharashtra government to take action against cheated persons

    तुळजापूर देवस्थानच्या दागिने व नाण्यांच्या गैरवापराबाबत कारवाई करण्याचे सीआयडीचे महाराष्ट्र सरकारला पत्र

    उस्मानाबाद जिल्हयातील श्री तुळजाभवानी मंदिरातील साेने व चांदीचे दागिने आणि प्राचीन नाणी व इतर माैल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या दाेषींवर कारवाई करण्याचे विनंती स्मरणपत्र पाठवले आहे. Tuljalbhavani tempal gold and silver jewellery scam enquiry by CID and they send letter to Maharashtra government to take action against cheated persons


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : उस्मानाबाद जिल्हयातील श्री तुळजाभवानी मंदिरातील साेने व चांदीचे दागिने आणि प्राचीन नाणी व इतर माैल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या दाेषींवर कारवाई करण्याचे विनंती स्मरणपत्र पाठवले आहे. नुकतेच याबाबतचे सरकारला आम्ही पत्र पाठवले असून त्यावर राज्यसरकारने कारवाई करण्याची अपेक्षा असल्याचे मत सीआयडीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

    सन २०२० मध्ये तुळजाभवानी मंदिरात दान आलेल्या साेने चांदीचे दागिने, माैल्यवान वस्तू आणि प्राचीन नाणी याच्या साठयात मंदीर ट्रस्टच्या विश्वस्तांना तफावत आढळून आली. त्यामुळे याप्रकरणी लेखापरीक्षण करण्यात आले त्यानुसार ३४८ ग्रॅम साेने, ७१ किलाे चांदी व ७१ प्राचीन नाण्यांचा तुटवडा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे याप्रकरणी तुळजापूर पाेलीस ठाण्यात मंदिराचे तत्कालीन माजी अधिकाऱ्यां विराेधात आर्थिक फसवणुक, बनावट कागदपत्रे, चाेरीचा गुन्हा करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली. याच दरम्यान राज्यसरकारने यासंर्दभातील चाैकशी करण्याचे आदेश सीआयडीला ही दिले. त्यानुसार, सीआयडीने सखाेल चाैकशी करुन त्याबाबतचा अहवाल सन २०२० मध्येच राज्यसरकारला सादर करत दाेषींवर कारवाई करण्याची शिफारस केली.



    प्रशासकीय तृटी, गैरव्यवहार कशाप्रकारे झाला आणि या गैरव्यवहारामागे वेगवेगळया पातळीवर नेमके काेण सहभागी हाेते याची माहिती सीआयडीने अहवालात नमूद केली आहे. न्यायालयात याप्रकरणी केस दाखल केलेल्या उस्मानाबाद येथील याचिकाकर्त्याच्या अर्जावरील सुनावणीत राज्यसरकारने सीआयडीच्या अहवालानुसार दाेषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे संबंधित केस स्थगित करण्यात आली हाेती. परंतु काेराेनाच्या दाेन वर्षानंतरही राज्यसरकारने याप्रकरणात दाेषींवर कारवाई न केल्याने याचिकाकर्त्याने पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठाेठावत, न्यायालयाच्या आदेशाचा सरकारने अवमान केला अशी नवीन याचिका दाखल केली आहे.

    Tuljalbhavani tempal gold and silver jewellery scam enquiry by CID and they send letter to Maharashtra government to take action against cheated persons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!