विशेष प्रतिनिधी
तुळजापूर : येथील तुळजाभवानी देवस्थानच्या माध्यमातून तुळजापूर येथे कोरोना रुग्णांसाठी ३०० बेड असलेले सुसज्ज हॉस्पिटल उभारले जात आहे. यापैकी १५० बेड हे ऑक्सिजन असणार आहेत. त्यातील ५० बेडचे काम पूर्ण झाले असून १०० ऑक्सिजन बेडचे काम सुरू आहे.Tuljabhaawani Mandir will built covid hospital
तुळजापूर शहरात ट्रस्टच्या मालकीच्या इमारती (धर्मशाळा) आहेत. शिवाय तेथे पाणी तसेच विजेचीही सोय आहे. या ठिकाणी हे हॉस्पिटल असणार आहे. तत्काळ डॉक्टर उपलब्ध झाले तर हे हॉस्पिटलही सुरू होऊ शकते.
- पीएमकेअरमधून शंभर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प; तसेच ५० हजार टन पुरवठ्यासाठी जागतिक टेंडर
तुळजापूरप्रमाणेच राज्यातील अन्य मोठ्या देवस्थानांच्या शहरातही असाच प्रयोग होतोय का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.तुळजाभवानी राज्यासह देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ होय.
हजारो भाविकांच्या दातृत्वातून ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात देणगी जमा होते. सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मंदिर समितीने कोरोना हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्यासाठी आरोग्यसेवक, डॉक्टरांची गरज आहे. इच्छुक डॉक्टरांनी येथे सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.