• Download App
    परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले 14 रुग्णांचे प्राण । Tree falls on oxygen plant at Parbhani district hospital, staff promptly saves 14 lives

    परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले १४ रुग्णांचे प्राण

    Parbhani district hospital : येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात मंगळवरी रात्री ऑक्सिजन प्लांटवर झाड कोसळले होते. यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती. पाइपलाइन लीक झाल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परतेने पावले उचलत ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या 14 रुग्णांचे प्राण वाचवले. Tree falls on oxygen plant at Parbhani district hospital, staff promptly saves 14 lives


    विशेष प्रतिनिधी

    परभणी : येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात मंगळवरी रात्री ऑक्सिजन प्लांटवर झाड कोसळले होते. यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती. पाइपलाइन लीक झाल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परतेने पावले उचलत ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या 14 रुग्णांचे प्राण वाचवले.

    पाइपलाइन लीक होताच जम्बो सिलिंडरची व्यवस्था

    उपविभागीय अधिकारी संजय कुंडेत्कर यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पाइपलाइन लीक झालेली पाहताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांसाठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली होती. ते म्हणाले की, रात्री साधारण साडेअकराच्या सुमारास झाडाची एक फांदी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर पडली होती. यामुळे पाइपलाइन लीक झाली होती. ही माहिती समजताच ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या 14 रुग्णांसाठी जम्बो सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली. आता पाइपलाइनची दुरुस्ती करून पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.’

    अधिकारी- नेत्यांनी रात्र काढली जागून

    शिवसेनेचे खासदार बंडू जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी तातडीने तेथे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करत कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. गळती रोखण्यासाठी शहरातील बायो मेडिकल इंजिनिअर सुनील कुलकर्णी यांना तातडीने बोलावण्यात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अत्यंत काळजीपूर्वक गळती बंद करून अपघात विभाग सोडून अन्य विभागांचा पुरवठा सुरू करून दिला. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून परिस्थिती हाताळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत मदतीचं काम केलं.

    अग्निशमन दलाचे जवान, फेब्रिकेटर वर्कर, गॅस पाइपलाइन दुरुस्त करणारे कामगार यांनी हे झाड पूर्णपणे हटवले. ऑक्सिजन पाइपलाइन पूर्ववत करून घेत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करेपर्यंत मदतीचा हात दिला. यादरम्यान अधिकारी आणि नेत्यांनी रात्र जागून काढली. सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे लक्ष ठेवून होते.

    Tree falls on oxygen plant at Parbhani district hospital, staff promptly saves 14 lives

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!