टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले आहेत. २००७आणि २०१६ साली दोन्ही टीममध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.Today’s T20 match will be a test of Virat Kohli’s leadership, against New Zealand
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज ( ३१ ऑक्टोबर ) संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंडने स्पर्धेतले आपले पहिले सामने पाकिस्तानविरुद्धच गमावले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियासाठी सेमी फायनल गाठणं कठीण होऊन बसेल. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले आहेत. २००७आणि २०१६ साली दोन्ही टीममध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
न्यूझीलंडविरुद्ध भारताला आज टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ साखळी लढतीत ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह खेळावे लागेल. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेची आज अग्निपरीक्षा आहे.
दरम्यान या सामन्यात चाहत्यांची अपेक्षापूर्ती होईल का?याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेला पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारावी लागणार आहे.
कर्णधार या नात्याने अखेरची स्पर्धा खेळत असलेला कोहली हार मानणाऱ्यांपैकी नाही. तसेच अनेकदा संकटमोचक सिद्ध झालेला कोहली गेल्या काही महिन्यांपासून कर्णधार आणि फलंदाज या दोहोंमध्ये ताळमेळ साधू शकला नाही. भारतीय संघ अखेरच्या टप्प्यापर्यंत खेळत राहणे चाहत्यांचीच नव्हे तर आयसीसीच्या व्यावसायिक हिताची देखील गरज ठरावी. आयपीएल स्टार्सचा भरणा असलेला भारतीय संघ स्पर्धेतून लवकर बाद होण्यास केवळ एक पराभव कारणीभूत ठरू शकतो.
Today’s T20 match will be a test of Virat Kohli’s leadership, against New Zealand
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधित होणाऱ्यांपेक्षा दुप्पट; आकडेवारीत बाब स्पष्ट
- नवाब मलिक यांचा नवा दावा, क्रूझ रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून आले होते जेवण, जेवणासोबतच पाठवले होते ड्रग्ज!
- पुण्यात चोरांचा उच्छाद, ७० वर्षीय महिलेचा खून करून लाखोंचे दागिने लंपास
- एनसीबीचा पंच किरण गोसावीविरुद्ध फसवणुकीचा तिसरा गुन्हा पुण्यात दाखल