मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या जाहीर सभांच्या मध्येच लोकसत्ताला मुलाखत देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मधेच “दृष्टी आणि कोनचा” मायलेज मिळवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांनीच केलेल्या विधानातून तो फसला…!! काय म्हणाले ते…?? म्हणे, बाळासाहेब भोळे होते. भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना अनेकदा फसवले. हे मी माझ्या डोळ्याने पाहिले होते. केवळ हिंदुत्वासाठी त्यांनी त्याकडे काणाडोळा केला होता. पण मी भोळा नाही. मी भाजपशी थोडा धूर्तपणे वागलो. (म्हणून मी आज मुख्यमंत्री आहे.) अशी एक प्रकारे कबुलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. today’s public meetings of MNS chief Raj Thackeray and Leader of Opposition Devendra Fadnavis
– अमित शहांबरोबर चर्चा
सरकारला 2.5 वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्र्यांनी मुलाखत देऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत, जे शिवसैनिकांसाठी आणि हिंदूंसाठी मंदिर आहे. त्यामध्ये 2.5 वर्षांपूर्वी अमित शहा बरोबरच्या चर्चेत नेमके काय झाले असेल…??, याचे चुणूक दाखवली…!! त्यांनी उघडपणे भाजपशी आपण धूर्तपणे वागण्याची कबुली देऊन एक प्रकारे “राजकीय प्रामाणिकपणा” दाखवला.
– हिंदुत्वाशी गद्दारी
भाजप हा पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. उगाच अनावश्यक स्तुती करण्यात मतलब नाही, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील आपण भाजपशी धूर्तपणे वागून हिंदुत्वाशी गद्दारी केली हीच ती कबुली दिली आहे…!!
– पण साध्य काय केले??
पण यातून खरच साध्य काय झाले…?? शिवसेनेला आणि विशेषत: ठाकरे घराण्याला आपली प्रतिज्ञा मोडून मुख्यमंत्री पद मिळवावे लागले, हे नक्कीच घडले. पण पक्ष संघटना म्हणून शिवसेनेला काय मिळवता आले…?? किंबहुना याच बरोबरीने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी नंतर जी गुळमुळीत भूमिका घेतली त्या भूमिकेतच शिवसेनेचे संघटना म्हणून कशी हानी झाली आहे याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली आहे…!!
– निधी वाटपात शिवसेना मागे
शिवसेनेचे 25 आमदार निधीच्या मुद्द्यावर नाराज आहेत. ते उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध बोलले आहेत. जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आहेत. तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र “सर्वपक्षीय” आमदार निधीसाठी थोडे नाराज असल्याची मखलाशी करत करत होते… यातच सगळे आले…!! निधी वाटपाचे आकडे सगळ्या वृत्तवाहिन्यांनी काहीच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. 54 आमदारांची राष्ट्रवादी पहिल्या नंबरवर, 44 आमदारांची काँग्रेस दुसऱ्या नंबर वर आणि 56 आमदारांची शिवसेना तिसऱ्या नंबरवर निधी वाटपात ढकलली. ही उघड आकडेवारी या वृत्तवाहिन्यांनी जाहीर केली होती.
– राष्ट्रवादीपुढे शस्त्र टाकले
मात्र, मुख्यमंत्र्यांना लोकसत्ताला मुलाखतीत देताना ही आकडेवारी दिसली नाही. त्यांनी शिवसेना आमदारांच्या नाराजीला वेगळेच वळण घेऊन नुसती मलमपट्टी केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसेनेला शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात ते समाधान देऊ शकत नाहीत ही अप्रत्यक्ष कबुली होती. एक प्रकारे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची धूर्तपणे वागून आपण राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे शिवसेनेचे स्वतःजवळील धारदार शस्त्र टाकून दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सूचित केले.
– बाळासाहेब – पवार मैत्रीची मखलाशी
आणि म्हणूनच त्यांनी बाळासाहेब आणि शरद पवार यांची कशी मैत्री होती… भले ते एकमेकांवर जाहीर सभांमध्ये आसूड ओढत उडत होते पण वैयक्तिक पातळीवर ते मित्र होते. आजही शरद पवार वडीलकीच्या नात्याने सल्ला देतात, वगैरे मखलाशी मुख्यमंत्र्यांना करावी लागली. खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांची आणि शिवसेनेची कोंडी झालेली अवस्था या मखलाशीतूनच स्पष्ट होते. भले मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी ते भाजपशी धूर्त वागून यशस्वी ठरले असतील, पण त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीपुढे शस्त्रे टाकावी लागलीत ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही. जी लोकसत्तेच्या मुलाखतीमुळे मुख्यमंत्र्यांनी न बोलताही उघड झाली…!!
today’s public meetings of MNS chief Raj Thackeray and Leader of Opposition Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!
- राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादीचा शिवसेनेवर बाण, म्हणूनच दिली औरंगाबादमध्ये सभेला परवानगी
- Gorakhpur Temple Attack : दहशतवादी मुर्तजा अब्बासीचे ISIS कनेक्शन उघड; इ वॉलेटमधून 8.5 लाख रूपये पाठविले!!
- आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मुस्लिम महिलांनाच हवा आहे समान नागरी कायदा, कारण…
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अमित शाह यांचा अभ्यास, सलग तीन-साडेतीन तास शिवकथाकारासारखे बोलतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला अनुभव