• Download App
    पुणेकरांसाठी आजचा शुक्रवार 'गुड फ्रायडे ',कित्येकवर्ष कागदावर असलेली मेट्रो आता धावणार….। Today's Friday 'Good Friday' for Punekars, Metro which has been on paper for many years will now run.

    पुणेकरांसाठी आजचा शुक्रवार ‘गुड फ्रायडे ‘,कित्येकवर्ष कागदावर असलेली मेट्रो आता धावणार….

    आज शुक्रवारी ही मेट्रो धावताना पुणेकरांना दिसणार आहे. प्रत्यक्षात त्यातून प्रवास करण्यासाठी मात्र अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. Today’s Friday ‘Good Friday’ for Punekars, Metro which has been on paper for many years will now run.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांचं स्वप्न बनून राहिलेली मेट्रो आज ( शुक्रवार 30 जुलै ) धावणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याची घोषणा केली आहे. मुहूर्त शुक्रवारी सकाळी 7 वाजता असून  पुणे मेट्रोची ट्रायल घेतली जाणार आहे. सकाळी 7 वाजता कोथरूड डेपोतून मेट्रो ट्रायलसाठी बाहेर पडेल आणि आयडियल कॉलनीपर्यंत ती जाईल, अशी माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे.

    पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.तसेच पुणे महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी या चाचणीसाठी हजर राहणार आहेत.

    नागपूर मेट्रोचं काम वेगानं होऊन ती मेट्रो धावू लागली तरी पुण्यातील मेट्रो मात्र अजुन सुरु झालेली नाही. पुणे मेट्रोचं काम इतर शहरांच्या तुलनेत धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोप वारंवार झाला आहे. मात्र आता शुक्रवारी ही मेट्रो धावताना पुणेकरांना दिसणार आहे. प्रत्यक्षात त्यातून प्रवास करण्यासाठी मात्र अजून थोडे दिवस वाट पहावी  लागणार आहे.

    Today’s Friday ‘Good Friday’ for Punekars, Metro which has been on paper for many years will now run.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते