• Download App
    सोमय्यांनी डिवचले; राऊत (चु*) घसरले; चंद्रकांतदादा संतापले...!!; सोमय्यांनी पुन्हा टोलवले...!!Today, once again, Kirit Somaiya passed away

    सोमय्यांनी डिवचले; राऊत (चु*) घसरले; चंद्रकांतदादा संतापले…!!; सोमय्यांनी पुन्हा टोलवले…!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी डिवचले. संजय राऊत (चु*) घसरले आणि चंद्रकांतदादा संतापले…!!, सोमय्यांनी पुन्हा टोलवले. आज दुपारपर्यंत हे महाराष्ट्रात घडले…!!Today, once again, Kirit Somaiya passed away

    तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज मुंबई दौऱ्यावर असून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मात्र या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. चंद्रशेखर राव यांची भेट घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींची परवानगी घेतली आहे काय? असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.

    त्यावर संजय राऊत यांनी संतापून किरीट सोमय्या यांच्यासारखे चु* 2024 नंतर राजकारणातून संपतील, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर संतापून चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय राऊत हे चौकशी आणि तपास यामुळे सैरभैर झाले आहेत. ते आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आवरावे, असे आवाहन केले आहे. संजय राऊत यांची भाषा दिवसेंदिवस घसरत चालल्याचे टीकास्त्र देखील त्यांनी सोडले आहे.

    संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांना “दलाल” आणि “भडवा” असे संबोधून घेतले होते. त्यानंतर आज त्यांनी चु* असे संबोधून आपण आणखी घसरल्याचे दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. कर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत चा नंबर पलटवार करताना काय द्यायची ती शिव्यांची डिक्शनरी एकदम मला देऊन टाका, असा टोला हाणला आहे.

    Today, once again, Kirit Somaiya passed away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस