आजच्या दिवशी शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. Today marks the second anniversary of the Mahavikas Aghadi government; MP Supriya Sule praised the government and wished it well
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज महाविकास आघाडी सरकार स्थापनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारची प्रसंशा करत शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारच्या द्विवर्षपूर्तीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वांचे हार्दिक अभिनंदन. सर्वांना पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा. असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केले आहे.
पुढे सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या की , महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. अनेक अडीअडचणीच्या काळात ठाकरे सरकार खंबीर पणे उभे राहिले. या सर्व संकटांतही हे सरकार जनसेवेसाठी सदैव कार्यरत राहिले. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या वाटेवर सोबत घेऊन चालणारे हे सरकार आहे.
Today marks the second anniversary of the Mahavikas Aghadi government; MP Supriya Sule praised the government and wished it well
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांची दुहेरी चाल; मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते हजर; पण उद्याची काँग्रेसची बैठक टाळणार!!
- मन की बात : आशीर्वाद द्यायचाच तर सेवेचा द्या! मी आजही सत्तेत नाही; भविष्यातही सत्तेत जायचं नाही माझ्यासाठी सेवा महत्त्वाची ; पंतप्रधानांनी पुन्हा जिंकले मन …
- ओमिक्रॉन भारतासाठी इशारा; गर्दी नको; मास्क आणि लसीकरण MUST!! : WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन
- कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज