आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं आहे.Today is the fifth day of the strike of ST workers, self-immolation agitation in front of the Ministry
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पाच दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारकडून ठोस आश्वासन मिळालं नाहीय. दरम्यान आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं आहे.
…तर ST कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला जनशक्तीच्या जवळपास 20 ते 30 कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन केलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्याही सामिल झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. हा आवाज शासन ऐकणार का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
महामंडळाचं शासनामध्ये विलिनिकरण झालंच पाहिजे, एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंत्रालय परिसर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली.
दरम्यान आंदोलनकर्त्यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले की , न्याय हक्कांसाठी आम्ही गेले अनेक दिवस आझाद मैदानावर बसलोय.पण सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही. आमचं म्हणणं पण ऐकून घ्यायला तयार नाही. एस टी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची दैना झालीय. छटाकभर पगारात कुटुंब कसं जगवायचं, याचा समोर प्रश्न आहे. पण सरकार आमचा आवाज ऐकायला तयार नाही.
Today is the fifth day of the strike of ST workers, self-immolation agitation in front of the Ministry
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी