• Download App
    तान्हाजी मालुसरे यांचा आज हौतात्म्य दिन सिंहगड किल्ल्यावरील युद्धात गाजवला अविस्मरणीय पराक्रमToday is the day of martyrdom of Tanhaji Malusare Unforgettable feat in the battle of Sinhagad

    तान्हाजी मालुसरे यांचा आज हौतात्म्य दिन सिंहगड किल्ल्यावरील युद्धात गाजवला अविस्मरणीय पराक्रम

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शिवाजी महाराजांचे सुभेदार सरदार तान्हाजी मालुसरे यांचा आज हौतात्म्य दिन. ४ फेब्रुवारी १६७० याच दिवशी उदयभानला सिंहगड किल्ल्यावरील युद्धात मारून हौतात्म्य पत्करले. उदयभान हा औरंगजेब याचा खास योध्दा सुभेदार होता. त्याला ठार केल्याने मोगलाई हादरली. Today is the day of martyrdom of Tanhaji Malusare Unforgettable feat in the battle of Sinhagad

    सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात तान्हाजी यांचे बालपण गेले. लहान पणापासूनच डोंगरदऱ्यांची माहिती असलेला हा तरुण होता. वडिलांच्या मृत्यूनंतर ते रायगड जिल्ह्यातील उंबरठ गावी म्हणजेच त्यांचा शेलारमामा यांच्या गावी गेले. शिवाजी महाराजांच्या बालमित्रांमध्ये ते होते.

    स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तान्हाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठ या गावात येऊन ते राहिले होते. आपलेपणाने वागून लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. रायबा आणि उमाबाई (मुलगा-मुलगी) काळोजी राव मालुसरे आणि पार्वतीबाई (वडील – आई) असा त्यांचा परिवार होता.

    अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तान्हाजींनी सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

    तान्हाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना मुलाच्या,रायबा याच्या लग्नाच्या निमंत्रणासाठी देण्यासाठी राजगडावर गेले, तेव्हा समजले की महाराज कोंढाण्यावर हल्ला करणार आहेत. ते समजून तान्हाजी मालुसरे मुलाच्या लग्नासारख्या कामाला महत्त्व दिले नाही शिवाजी महाराजांची कोंढाणा किल्ला जिंकण्याची गरज अधिक महत्त्वाची मानली.

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक सरदार होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा स्वारीसाठी वीर तानाजी मालुसरे यांची निवड केली. तान्हाजी मालुसरे,शेलारमामा आणि शूर मावळ्यांमुळे कोंढाणा स्वराज्या मध्ये सामील झाला परंतु तान्हाजी मारले गेले. तान्हाजींचा मृतदेह किल्ल्यावरून ज्या मार्गाने कोकणात उमरठकडे नेला त्या मार्गाला मढे घाट म्हणतात.

    तान्हाजींचे थेट वंशज आजही हयात असून मध्यंतरी ओम राऊत दिग्दर्शक असलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे तान्हाजींचे सिंहासारखे शौर्य आणि सिंहगड यांची देशभरात ओळख होण्यासाठी मदत झाली.

    Today is the day of martyrdom of Tanhaji Malusare Unforgettable feat in the battle of Sinhagad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस