प्रतिनिधी
मुंबई : भाजपने राज्यसभेची निवडणूक महाविकास आघाडी वर मात करून जिंकल्यानंतर विधानपरिषद निवडणुकी साठी मोठी बिल्डिंग लावलीच आहे, पण त्या पेक्षाही मोठी फिल्डिंग महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व म्हणजे 48 लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी लावली आहे. याची पहिली बैठक आज मुंबईत झाली. त्या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बरोबरच भाजपचे केंद्रीय राष्ट्रीय सचिव आणि हरियाणाचे प्रभारी विनोद तावडे हे उपस्थित होते. To mine the fort of NCP in Baramati ram shinde
या बैठकीत विविध नेत्यांना विविध मतदारसंघांचे मिशन म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी बारामती मतदार संघाचे असून ती माजी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू राम शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. बारामतीत भाजप या सर्व समन्वयाची आणि निर्णय प्रक्रियेची जबाबदारी राम शिंदे यांच्यावर असेल.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा बारामतीतून निवडून आल्या असल्या तरी त्यांच्या मताधिक्यामध्ये मोठी भाजपने घडवून आणली होती. ज्या मतदारसंघामधून शरद पवार आणि सुप्रिया सुळे आधी काही लाखांच्या फरकाने निवडून येत होते, त्या बारामतीतून 2019 मध्ये सुप्रिया सुळे फक्त 74000 मतांनी निवडून आल्या आहेत. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी राष्ट्रवादीला अक्षरशः घाम फोडला होता.
आता लोकसभा निवडणुकीला सुमारे दोन वर्षे बाकी असताना राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप तेथे जोरदार फिल्डिंग लावणार आहे. मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केलाच होता त्यामुळे पवार घराण्याचा निवडणुकीत पराभवच होत नाही हा समज पार्थ पवारांच्या पराभवामुळे दूर झाला होता. आता प्रत्यक्ष बारामतीच्या गडाला सुरुंग लावून सुप्रिया सुळे यांना धक्का देण्यासाठी राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी भाजपने सोपवली आहे. त्यात ते यशस्वी झाले तर भाजपमध्ये मोठे जायंट किलर म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण होऊ शकते.
रोहित पवार यांच्या विरोधात कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला असला तरी भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन आधीच राजकीय ताकद दिली आहे. आता त्या पलिकडे जात थेट बारामतीची उमेदवारी देऊन शरद पवारांच्या राजकीय गडाला सुरुंग लावण्याची संधी राम शिंदे यांना पक्षाने दिली आहे.
To mine the fort of NCP in Baramati ram shinde
महत्वाच्या बातम्या
- MPSC : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वयोमर्यादेत राहुन कितीही वेळा देता येणार परीक्षा!!
- राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांच्या नकारानंतरही शिवसेनेचा त्यांच्याच नावाचा आग्रह; राज्यसभा निवडणुकीतला बदला??
- Donald Trump Birthday : भारतातील या मोठ्या शहरांत आहे ट्रम्प यांचा व्यवसाय, 2013 पासून झाली निवासी प्रकल्पांना सुरुवात
- तीन आंदोलनांच्या तीन गोष्टी : भाजप ते काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी; पाणी ते नेत्यांचा कथित अपमान!!