• Download App
    पुरग्रस्तांना अधिक नुकसान भरपाई देण्यासाठी संघर्ष देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा|To Give more compensation to flood victims We Will struggle: Devendra Fadnavis

    पुरग्रस्तांना अधिक नुकसान भरपाई देण्यासाठी संघर्ष देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : यंदाच्या पुरात २०१९ पेक्षा नुकसान अधिक झाल्याने अधिक नुकसान भरपाई मिळावी,यासाठी सरकारवर दबाव आणू. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू,अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.To Give more compensation to flood victims We Will struggle: Devendra Fadnavis

    भिलवडी येथील पाहणी प्रसंगी पूरग्रस्तांची संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ च्या प्रमाणेच हा महापूर आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झाले आहे.



    सर्व सामान्य माणसापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. २०१९ मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषा पलीकडे सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत केली होती. या वेळीही अधिक नुकसान आहे,

    त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी. त्या दृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर दबाव असेल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आमचा संघर्ष करू,असा इशाराही देवेंद्र फडणीस यांनी दिला.

    •  पुरग्रस्तांना जादा नुकसान भरपाई देण्यासाठी संघर्ष
    • सांगली जिल्ह्यात २०१९ पेक्षा गंभीर संकट
    •  सामान्य माणसापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
    •  मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारवर दबाव
    • भिलवडी येथील पाहणी प्रसंगी पूरग्रस्तांची संवाद
    • पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत संघर्ष करणार

    To Give more compensation to flood victims We Will struggle: Devendra Fadnavis

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल