• Download App
    पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचगंगा यात्रा; स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा पुढाकार । To Give Justice to flood-hit farmers raju sheti organised The Panchganga Yatra

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचगंगा यात्रा; स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा पुढाकार

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. To Give Justice to flood-hit farmers raju sheti organised The Panchganga Yatra

    करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात दुग्ध अभिषेक करून यात्रेला त्यांनी सुरुवात केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या महापुराच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे कर्ज पीक माफ करावे यासह विविध मागण्या आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकले आहे.



    आज प्रयाग चिखली येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. तब्बल पाच दिवस ही यात्रा सुरु राहणार असून नृरसिंह वाडी येथे जलसमाधीने आंदोलनाची सांगता होणार आहे.

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचगंगा यात्रा

    प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी असा यात्रेचा मार्ग

    नदीकाठावरून पाच दिवस चालत जाणार

    प्रयाग चिखली दत्त मंदिरात दुग्ध अभिषेक करून यात्रेला प्रारंभ

    २०१९ च्या महापुराच्या धर्तीवर नुकसान भरपाई द्या

    नृरसिंहवाडी येथे जलसमाधीने आंदोलनाची सांगता

    To Give Justice to flood-hit farmers raju sheti organised The Panchganga Yatra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना