प्रतिनिधी
औरंगाबाद : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकारचे प्रवक्ते संजय राऊत, शिल्पकार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अरे हे जरी कितीही आपले सरकार स्थिर असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीतल्या विसंगती आणि कुरबुरी थांबायला तयार नाहीत. Till now cold war against Shiv Sena’s NCP
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करतात, असा आरोप शिवसेनेच्या 25 ते 30 आमदारांनी केला आहे. हा आरोप अद्यापही कायम असून त्यांनी तो मागे घेतलेला नाही, पण आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना झुकते माप देत आहेत, असा आरोप होत होता. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राष्ट्रवादीचे मंत्री, नेते शिवसेनेवर आरोप करू लागले आहेत. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला आहे.
– अब्दुल सत्तार, संदीपान भुमरेंवर आरोप
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सत्तेच्या बळाचा वापर करुन कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली जात आहे. शिवसेना मंत्र्यांच्या अशा वागणुकीवरुन राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या औरंगाबादमधील कार्यक्रमात उघडपणे नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने युती धर्म पाळावा, असे मंत्री टोपे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावले. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे फोडाफोडी करत आहेत. ते आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेऊन जात आहेत. तसेच या शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. यातही तथ्य आहे. म्हणून या विषयावरुन मी सत्तार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडाफोडी करु नये, असे सांगणार आहे. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे राजेश टोपे म्हणाले.
– शिवसेनेचे 3 आमदार आदिती तटकरेंवर नाराज
महाविकास आघाडीतील कुरबुरीची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीवर महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही, असा आरोप झाला आहे. पारनेरच्या सात नगरसेवकांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी रायगडमधील शिवसेनेच्या 3 आमदारांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात बंड थोपटले होते. त्याआधी बीडमध्ये शिवसैनिकांनी उपुमख्यमंत्री अजित पवारांना थेट काळे झेंडे दाखवले होते.
– राज ठाकरे मराठवाडा दौरा
या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार या शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात आवाज काढणे याला विशेष महत्त्व आहे तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 1मे महाराष्ट्र दिन मराठवाडा दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी मधल्या वरिष्ठ मंत्र्यांमध्ये कुरबुरी वाढणे यातून राज ठाकरे यांना वेगळे राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे.
Till now cold war against Shiv Sena’s NCP
महत्त्वाच्या बातम्या
- अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी नोंदणी : श्री अमरनाथ श्राइन बोर्डची माहिती
- कार अपघातामध्ये चालकाचा मृत्यू
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका