• Download App
    डोंगरीच्या कारागृहात साकारणार टिळक - सावरकर स्मारक; राज्याच्या महिला बालकल्याण विभागाचा पुढाकारTilak - Savarkar memorial to be constructed in Dongri jail

    डोंगरीच्या कारागृहात साकारणार टिळक – सावरकर स्मारक; राज्याच्या महिला बालकल्याण विभागाचा पुढाकार

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य नेते भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या डोंगरी कारागृहात शिक्षा भोगली, त्या परिसरात टिळक – सावरकर स्मारक साकारण्याचा प्रस्ताव शिंदे – फडणवीस सरकारच्या विचाराधीन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. Tilak – Savarkar memorial to be constructed in Dongri jail

    मुंबईतील डोंगरी कारागृहात लोकमान्य टिळकांनी दोनवेळा शिक्षा भोगली. तेथे त्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्याच कोठडीत वीर सावरकरांनीही शिक्षा भोगली. वीर सावरकरांना दोनदा जन्मठेप, म्हणजेच ५० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेच्या निर्णयाची बातमी ही डोंगरीच्या कारागृहात मिळाली होती. या कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांनी ‘सप्तर्षी’ काव्य रचले. डोंगरीच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना, वीर सावरकर फिरण्यासाठी कारागृहाच्या आवारात यायचे तेव्हा आजुबाजुच्या इमारतीतील माणसे गोळा होऊन त्यांना अभिवादन करायची. टिळक-सावरकरांच्या अशा असंख्य आठवणी सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे स्मृती स्मारक उभारले जाणार आहे.

    याच कारागृहात सुधारक कार गोपाळ गणेश आगरकर यांनी देखील लोकमान्य टिळकांबरोबर शिक्षा भोगली होती त्यांनी त्या शिक्षेवर आधारलेले “डोंगरीतील दिवस” हे पुस्तक लिहिले आहे.

    या परिसरात पुरातन मंदिर आणि १०० वर्षे जुने झाड आहे. त्याला धक्का न लावता टिळक – सावरकर स्मारकाची उभारणी केली जाणार आहे. हे स्मारक ३-डी तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि ते सौरऊर्जेवर चालावे, अशी रचना केली जाईल. त्याशिवाय स्मारकाच्या आवारात दोन्ही महापुरुषांचे पुतळे उभारले जातील. टिळक आणि सावरकरांच्या जयंती – पुण्यतिथीला तेथे विशेष कार्यक्रम घेण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली.

    बचत गटांच्या माध्यमातून प्रदर्शन

    राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने टिळक – सावरकर स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे. महिला आणि बालकांशी संबंधित अनेक उपक्रम येथे राबवले जाणार आहेत. शिवाय बचत गटांच्या माध्यमातून दोन्ही महापुरुषांचे साहित्य, विचार आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या स्मारकासाठी मुंबई महापालिकेकडून निधी मागण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे कळते.

    Tilak – Savarkar memorial to be constructed in Dongri jail

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू

    Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध