• Download App
    किरीट सोमय्यांच्या रडारवर महाविकास आघाडीतील आणखी तीन मंत्री; घोटाळे काढणार बाहेर!!|Three more ministers from the Mahavikas Aghadi on Kirit Somaiya's radar; Scams out

    किरीट सोमय्यांच्या रडारवर महाविकास आघाडीतील आणखी तीन मंत्री; घोटाळे काढणार बाहेर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत. पुढच्या आठवड्यात ते आणखी तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.Three more ministers from the Mahavikas Aghadi on Kirit Somaiya’s radar; Scams out

    एवढेच नाही तर किरीट सोमय्या हे १० नोव्हेंबर रोजी एका मंत्र्याविरोधात तक्रार देखील दाखल करणार आहेत त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या रडारवर महाविकास आघाडीचे ते तीन नेते कोण, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. ८ आणि ९ नोव्हेंबरला दिल्लीत आयकर विभाग, सीबीडीटी, ईडी आणि सहकार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही ते भेट घेणार आहेत.



    सध्या किरीट सोमय्या हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकरणे उघडकीस आणत असतानाच त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणतात, मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग CBDT, ED, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

    १० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारचे मंत्री यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार. पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार, त्या पैकी हा पहिला खुलासा, अँक्शन, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

    Three more ministers from the Mahavikas Aghadi on Kirit Somaiya’s radar; Scams out

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य