विशेष प्रतिनिधी
नसरापूर : पुणे – सातारा महामार्गाजवळ आढळलेल्या तीन रानगव्यांना वन विभागाने पुन्हा जंगलात सोडले आहे. महामार्गाच्या जवळ ते एका झुडपात दडून बसले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली त्यामुळे ते गंगारून गेले होते. three Indian bison seen pune satara national highway
भोर तालुक्याच्या पूर्व भागातील सारोळा गावच्या – हद्दीत पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत असलेल्या झुडपात रानगव्यांचे दर्शन नागरिकांना झाले होते. प्रथम किकवी येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रानगवे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याने रानगवे पकडण्यासाठी भोर आणि नसरापूर वनपरिक्षेत्रतील पथकाला पाचारण करण्यात केले होते. दरम्यान, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि बघ्यांची संख्या वाढल्याने सुटका मोहीममध्ये अडथळा आला. अखेर राजगड पोलिसांना पाचारण करावे लागले.
three Indian bison seen pune satara national highway
महत्त्वाच्या बातम्या
- CDS Bipin Rawat : सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव आज दिल्लीत पोहोचणार; कुन्नूरमधील अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स आढळला
- ओमायक्रोनच्या धोक्यामुळे दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार, शिक्षण मंडळापुढे पेच; पर्यायी तोडग्याचा विचारही
- प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाविरोधी लसीकरणासाठी कॉल सेंटर उभारणार; ९८ लाख जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
- Bipin Rawat : जनरल रावत यांच्या जागी कोण ? सीडीएस म्हणून ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच नाव आघाडीवर…