विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात INDIA विरुद्ध NDA अशा दोन आघाड्यांच्या लढाईचे चित्र निर्माण झाले असले तरी कालच्या दोन बैठकांनंतरची राजकीय धूळ बसल्यानंतर देशातले चित्र अधिक स्पष्ट झाले आहे, ते म्हणजे NDA विरुध्द INDIA यांच्यात दोघात तिसरा आणि चौथा, लोकसभेसाठी दुरंगी लढाई विसरा!!, असे म्हणायचे वेळ आली आहे.Though NDA and INDIA lock horns for loksabha polls, there will be triangular or quadrangler fights in at least 175 constituencies
कारण NDA आणि INDIA या दोन आघाड्यांमध्ये नसलेले काही प्रबळ पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्यकर्ते तर आहेतच, पण आपली स्वतंत्र ताकद राखून ते NDA
आणि INDIA या दोन्ही आघाड्यांना निर्णायक आव्हान देऊन त्यांच्यावर मात करण्याची हिंमत राखणारे आहेत. वानगी दाखल उदाहरणे द्यायची म्हटली तर उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष, तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस, ओडिशात बिजू जनता दल हे बळकट सत्ताधारी पक्ष होते किंवा आहेत. कर्नाटकात जेडीएस, आसाम मध्ये ऑल इंडिया युनायटेड फ्रंट, हैदराबाद मध्ये एआयएमआयएम आदी पक्ष स्वतःची विशिष्ट ताकद राखून NDA आणि INDIA या दोन आघाड्यांशी लढत देऊ शकतात.
किमान 6 राज्यांमध्ये तिरंगी – चौरंगी लढती
त्यामुळे देशात काही विशिष्ट राज्यांमध्येच दुरंगी लढती होण्याची शक्यता असून बहुतांश राज्यांमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढतीच होण्याची शक्यता आहे. त्यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिषा, कर्नाटक, आसाम ही राज्ये प्रमुख आहेत आणि यातल्या किमान लोकसभेच्या 175 मतदारसंघांमध्ये इंडिया विरुद्ध इंडिया अशी दुरंगी लढत न होता ती तिरंगी वा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. किंबहुना खात्री आहे. आता जर लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी 175 जागांवर जर तिरंगी वा चौरंगी लढती होणार असतील, तर देशात केवळ दोन आघाड्यांमध्येच लढत आहे असे मानणे हेच मूळात राजकीय गृहीतकाच्या दृष्टीने चुकीचे आहे.
अकाली दल आणि तेलगू देशम
त्यातही वर उल्लेख केलेल्या पक्षांची आणखी असे पक्ष आहेत जे सध्या ताकदवान नसले तरी या दोन पक्षांनी तरी आपापल्या राज्यांमध्ये म्हणजे पंजाब आणि आंध्र प्रदेशात कधीकाळी राज्य केले होते, ते म्हणजे प्रकाश सिंग बादल यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल यांचे अकाली दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम. अकाली दल आणि तेलगू देशम हे दोन्ही पक्ष NDA मध्ये परतणार अशी चर्चा होती पण कालच्या NDA च्या बैठकीला हे दोन्ही पक्षांचे नेते हजर नव्हते. याचा अर्थ पंजाब मध्ये अकाली दल आणि आंध्र आणि तेलंगणात तेलगु देश हे दोन पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पंजाब आणि आंध्र – तेलंगणात तिरंगी नव्हे, तर चौरंगी लढ्याची होण्याची दाट शक्यता आहे.
अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA ने 38 पक्षांना गोळा करून आघाडीचा विस्तार केला असला तरी प्रत्यक्षात
NDA पुढे असलेले तिसरे आणि चौथे आव्हान देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याच आव्हानाचा मुकाबला 26 पक्षांच्या INDIA या आघाडीला देखील करावा लागणार आहे.
Though NDA and INDIA lock horns for loksabha polls, there will be triangular or quadrangler fights in at least 175 constituencies
महत्वाच्या बातम्या
- पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल
- बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सुप्रिया सुळेंच्या गैरहजर; काँग्रेस नेते आणि पवारनिष्ठ माध्यमांनाच दाट संशय!!
- तारक मेहता का उल्टा या मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार ?
- नेहले पे देहला : INDIA 26 विरुद्ध NDA 38; INDIA चा नेता कोण??; पण NDA ला मोदींचा बुस्टर डोस!!