• Download App
    “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे" - अजित पवार"Those who have done the work should be given credit for it" - Ajit Pawar

    “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार

    कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत.”Those who have done the work should be given credit for it” – Ajit Pawar


    विशेष प्रतिनिधी

    कर्जत-जामखेड : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत.दरम्यान या कामांचा शनिवारी म्हणजे आज शुभारंभ अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि दत्तामामा भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

    यावेळी अजित पवार म्हणाले की “काही लोकांनी निवडणुका समोर ठेवून काही तरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न केला. जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. पिण्याचे पाणी जास्त दाबाने मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आणि मी प्रयत्न केला. रोहित पवार यांनी पाठपुरावा केली आणि आता आपण ही योजना मार्गी लावली आहे.



    पुढे अजित पवार म्हणाले की ,मागे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या .दरम्यान त्यावेळचे मुख्यमंत्री इथे आले होते. त्यांनी एक कागद दाखवला आणि सांगितले तत्वतः तुमची योजना मंजूर केली आहे.आओ तत्वतः म्हणजे काय? एकदा योजना मंजुर तरी करायला हवी किंवा मंजुर करणार आहोत असे सांगितले पाहिजे. “असे अजित पवार यांनी म्हटले.

    दरम्यान अजित पवार यांनी कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवार म्हणाले “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे.आम्ही आमदारांचा निधी चार कोटी केला.मात्र केंद्राने खासदारांचा निधी बंद केला होता.आधीच्या आमदारांच्या कामाचा दर्जा चांगला नव्हता.त्यामुळे केलेले काम अडचणीत येत होते.आज रोहित पवार चांगल्या दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

    पुढे अजित पवार म्हणाले की ,“या कामांसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निधी देण्याचे काम आपण करत आहोत. यामध्ये मागच्या आमदारांनी सांगितले हे माझ्या काळात झाले आहे तर यात काही तथ्य नाही. कामे त्या त्या वेळेत करावी लागतात. निधी द्यावा लागतो. तुम्ही १० वर्षे आमदार असताना केलेली कामे दिसत आहेत. पण आता रोहित पवार जी कामे करत आहे त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालला आहे.आता तुम्ही जरा शांत बसा.आता लोकांनी थांबवलेले आहे ते मान्य करावे. याउलट आपले कुठे चुकले आणि आपण कुठे कमी पडलो त्याचे आत्मपरिक्षण करा. त्यातून बोध घ्या,” असे अजित पवार म्हणाले.

    “Those who have done the work should be given credit for it” – Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस