• Download App
    विधिमंडळात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून करणार कोरोना चाचणी : आदित्य ठाकरे । Those entering the legislature from today To test corona: Aditya Thackeray

    विधिमंडळात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून करणार कोरोना चाचणी – आदित्य ठाकरे

    वृत्तसंस्था

    मुंबई :  राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे दोन दिवस उरले आहेत. विधिमंडळात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून कोरोना चाचणी करणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. Those entering the legislature from today To test corona: Aditya Thackeray

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे अधिवेशनाला गैरहजर आहेत. याबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. तसेच विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला. एक मंत्री आणि एका आमदारालाही कोरोना झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळ आवारात प्रवेशापूर्वी आजपासून प्रत्येकाची कोरोना चाचणी करणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.



    विधिमंडळ परिसरात दोनच दिवसांत ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह आमदार समीर मेघे यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “गर्दी वाढली आहे. ख्रिसमस न्यू-ईयर असताना लोक काळजी जास्त घेत नाहीत. प्रत्येकानं मास्क वापरणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेजबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार घ्यावा लागेल. शाळांसंदर्भात पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ.”

    Those entering the legislature from today To test corona: Aditya Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस