• Download App
    ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा' ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला । This is a government-inspired assassination! A case under section 302 should be filed against this murderous government '; Chitra Wagh targeted the state government

    ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला

    २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. ‘This is a government-inspired assassination! A case under section 302 should be filed against this murderous government ‘; Chitra Wagh targeted the state government


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. त्यानंतर १ वर्षे उलटूनही मुलाखती घेतल्या नाही,दरम्यान या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने पुण्यातील फुरसंगी येथे गळफास लाऊन आत्महत्या केली होती.

    मात्र आत्महत्येला सहा महिने उलटले असून नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत त्याचे नाव आले आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यानयावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाना साधला आहे.



    याबाबत चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नव्हती.या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं ६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय.दरम्यान प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा स्वप्नील बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं. या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा.’ असा निशाणा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर साधला आहे.

    This is a government-inspired assassination! A case under section 302 should be filed against this murderous government ‘; Chitra Wagh targeted the state government

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस