चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांनी सरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का? राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत.This government is working part time, Chitra Wagh strongly criticizes the state government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांना एक अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत आहे.तसेच अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची तक्रार आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून केली आहे.या प्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी सरकरावर जोरदार टिका केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजपाचे जेष्ठ नेते आशिष शेलार यांना व त्यांच्या परीवाराला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का? राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत.
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की , “एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडे मुडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मुडमधून बाहेर पडले नाहीत. हे सरकार पार्ट टाईम काम करतयं, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का?” अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
This government is working part time, Chitra Wagh strongly criticizes the state government
महत्त्वाच्या बातम्या
- Assembly Election २०२२ Date : पाच राज्यांमध्ये निवडणूकीची घोषणा, १० मार्चला निकाल, यूपी-पंजाब-उत्तराखंड-गोवा आणि मणिपूरमध्ये कधी होणार मतदान? वाचा सविस्तर…
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती
- कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झाली हाणामारी, १ कैद्याचा मृत्यू ; ६ कैद्यांवर गुन्हा दाखल
- पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाबच्या डीजीपींना हटवले, निवडणुका जाहीर होण्याआधी चन्नी सरकारचा निर्णय, अन्यथा आयोगाकडे गेला असता अधिकार