• Download App
    देशातील 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती तब्बल 58 लाख कोटींच्या पुढे, एका वर्षात अदानींची संपत्तीत तिप्पट वाढ । The total wealth of the countrys 100 rich crossed the record 58 lakh crores, Adani wealth tripled in a year

    देशातील 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती तब्बल 58 लाख कोटींच्या पुढे, एका वर्षात अदानींची संपत्तीत तिप्पट वाढ

    फोर्ब्स मॅगझिनने 2021 मध्ये भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, या 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती विक्रमी 775 अब्ज डॉलर्स (सुमारे 58.06 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सुमारे 92.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 6.89 लाख कोटी रुपये) निव्वळ संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. The total wealth of the countrys 100 rich crossed the record 58 lakh crores, Adani wealth tripled in a year


    वृत्तसंस्था

    मुंबई : फोर्ब्स मॅगझिनने 2021 मध्ये भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, या 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती विक्रमी 775 अब्ज डॉलर्स (सुमारे 58.06 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सुमारे 92.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 6.89 लाख कोटी रुपये) निव्वळ संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

    फोर्ब्स एशियाच्या ताज्या अंकातील या यादीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी 74.8 अब्ज डॉलर (सुमारे 5.6 लाख कोटी रुपये) संपत्तीसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

    फोर्ब्समध्ये भारताचे कौतुक

    या अहवालात भारताची स्तुती करताना असे म्हटले गेले आहे की, कोविडच्या दुसऱ्या लाटेचा चांगला सामना केल्यामुळे जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. शेअर बाजारात बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 52 टक्क्यांनी वाढला आहे.



    यामुळे देशातील 100 श्रीमंतांची संपत्ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गेल्या 12 महिन्यांत, त्याची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली. ती सुमारे 257 अब्ज डॉलर वाढीसह 775 अब्ज डॉलर झाली आहे.

    अदानींच्या संपत्तीत तिप्पट वाढ

    अहवालानुसार, या वाढीचा सुमारे 20 टक्के भाग एकटा गौतम अदानींचा आहे, त्यांची संपत्ती एका वर्षात जवळपास तीन पटींनी वाढून 74.8 अब्ज डॉलर (सुमारे 5.6 लाख कोटी रुपये) झाली आहे. सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंतांच्या या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

    मुकेश अंबानी 2008 पासून सातत्याने या यादीत पहिल्या स्थानावर राहिले आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नादर 31 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत आणि राधाकृष्ण दमानी 29.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह यादीत चौथ्या स्थानावर आहेत.

    सायरस पूनावाला पाचव्या, लक्ष्मी मित्तल सहाव्या, सावित्री जिंदल सातव्या, उदय कोटक आठव्या, पलोनजी मिस्त्री नवव्या आणि कुमार मंगलम बिर्ला 10 व्या क्रमांकावर आहेत.

    The total wealth of the countrys 100 rich crossed the record 58 lakh crores, Adani wealth tripled in a year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!