प्रतिनिधी
मुंबई : केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवार योजनेला बदनाम केले. पण ते करणाऱ्यांचेच दात घशात गेले, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.The teeth of those who slandered the water-filled camp went to their throats; MLA Ashish Shelar’s Tola
जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी महा विकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारने समिती नियुक्त केली. त्यावेळी महाविकास आघाडीने आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही.’ पण प्रत्यक्षात चौकशी समितीला तसे काहीही आढळले नाही, असा टोलाही शेलार यांनी लगावला.
चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तरे दिलीत? जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले. त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.
मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केले. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोलाही त्यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
The teeth of those who slandered the water-filled camp went to their throats; MLA Ashish Shelar’s Tola
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : विदर्भात शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारातच करायची का? पश्चिम महाराष्ट्र, कोकणला अधिक मदत : अनिल बोंडे
- अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश!!; ज्येष्ठ नागरिकांना लुभावण्याचा प्रयत्न
- Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या काझींचा खुलासा, म्हणाले- ‘लग्नाच्या वेळी मुसलमान होते संपूर्ण कुटुंब’
- PM मोदींची सत्तेतील 20 वर्षे, अमित शाह म्हणाले- “पंतप्रधान मोदींना आज माझ्यापेक्षा जास्त जनता ओळखते!”