वृत्तसंस्था
पुणे : ससून रुग्णालयात मनुष्यबळ न वाढविताच कोरोनाचे ३०० बेड वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ससूनमधील निवासी डॉक्टरांनी काम बंदचा इशारा दिला आहे.
ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने शुक्रवारपासून तातडीच्या नसलेल्या वैद्यकीय सेवांचे काम बंद करण्याचा इशारा दिला. मात्र, कोरोना वॉर्डसह तातडीच्या इतर सेवेवर परिणाम होणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले. The sudden increase in the number of beds in Sassoon, a warning to stop the work of resident doctors; Demand for further increase in manpower
मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, ससूनमध्ये ५५० कोरोनाचे आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढविले तर किमान १०० डॉक्टरांची गरज आहे. तरच रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही आमची मागणी मांडली.
आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कोरोना वॉॅर्ड, कॅॅज्युलिटी, आयसीयू, लेबर रूम, सर्व प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सेवा देणे बंद केली जाईल.