• Download App
    संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत आहे,एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा - संजय राऊतThe state's interest is being threatened due to the strike, ST workers should think at least once - Sanjay Raut

    संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत आहे,एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा – संजय राऊत

    भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना खोटी सहानुभूती दाखवत त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.The state’s interest is being threatened due to the strike, ST workers should think at least once – Sanjay Raut


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच आता भाजपनेही त्यांच्या या आंदोनलात उडी घेतली असून राज्यसरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.



    राज्य सरकारला नाईलाजाने काही पावलं उचलावी लागतात, पण तसे होऊ नये असे मला वाटते. राज्याच्या हिताच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करायला हवा. आम्ही नेहमीच कामगारांच्या बाजूने उभे राहिलो आहोत. पण राज्य आणि राष्ट्राचे हीत पाहिले पाहिजे. संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना खोटी सहानुभूती दाखवत त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां त्यांच्या प्रश्नांविषयी सहानुभूती आहे. शिवसेनेचा जन्मही कामगार क्षेत्रातूनच झाला आहे. संपूर्ण राज्यात शिवसेना कष्टकऱ्यांचं नेतृत्व करत आहे. त्यामुळेएसटी कर्मचाऱ्यांविषयी आमची भूमिका चुकीची आहे हे सांगण्याची आम्हाला गरज नाही, असंही संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

    The state’s interest is being threatened due to the strike, ST workers should think at least once – Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस