प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांपासून पेटलेला खोके – बोकेचा वाद अखेर शिंदे गटाने न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाचे आमदार मानहानीच्या नोटिसा पाठवणार असून त्याच्या केसेस हायकोर्ट चालवण्याच्या आग्रह धरणार आहेत. The Shinde group dragged the box-box dispute to the court
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून 40 आमदार फोडल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांवर 50 खोकी घेतल्याचा आरोप केला. संपूर्ण विधानसभा अधिवेशन काळात 50 खोके, एकदम ओके, 50 खोके, खातात बोके या घोषणा गाजवल्या. आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे हे प्रत्येक जाहीर सभेत शिंदे गटाच्या 50 खोक्यांचा उल्लेख करून त्यांना डिवचत आले आहेत.
खोके घेतल्याचे हे आरोप कुठेतरी थांबले पाहिजेत, असे म्हणून शिंदे गटाने त्यांना न्यायालयात खेचण्याचा इरादा पक्का केला आहे. शिंदे गटाचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत स्पष्ट सांगितले आहे. एकतर अजितदादा, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांनी 50 खोकी म्हणजे 2500 कोटी रुपये घेतल्याचे न्यायालयात सिद्ध करावे न्यायालयात पुरावे द्यावेत. अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर सामोरे जावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. आज पासून शिंदे गटातल्या आमदारांनी ही कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
The Shinde group dragged the box-box dispute to the court
महत्वाच्या बातम्या
- 18000 पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
- वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश
- राजकीय नेत्यांच्या (अ)सभ्यतेच्या मर्यादा
- हिंदुत्ववादी आंदोलनाचा दणका; मुंबईतला इंटरनॅशनल हलाल शो रद्द
- आज 2022 मधले अखेरचे चंद्रग्रहण; या आहेत वेळा
- काँग्रेस तर नाहीच पण प्रकाश आंबेडकरांपुढे आता ठाकरे गटाशीच आघाडीचा पर्याय खुला??