कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी २०१९-२० साली देशातील सर्वाधिक नफा कमाविणारी कंपनी ठरली आहे. सीरमने पाच हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के इतका आहे.कोव्हिशिल्ड ही लस सीरमतर्फे बनविण्यात येते. सध्या कंपनीने प्रचंड ऑर्डर असून त्या पूर्ण करणे अवघड झाले आहे. The Serum Institute of Pharmaceutical companies earned the highest profit in the country
प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी २०१९-२० साली देशातील सर्वाधिक नफा कमाविणारी कंपनी ठरली आहे. सीरमने पाच हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के इतका आहे.कोव्हिशिल्ड ही लस सीरमतर्फे बनविण्यात येते. सध्या कंपनीने प्रचंड आॅर्डर असून त्या पूर्ण करणे अवघड झाले आहे.
कॉर्परेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात अभ्यास करणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार सन २०१९-२० मध्ये भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केला आहे. सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा सामावेश आहे.
पाच हजार कोटींचा व्यवसाय कंपन्यांच्या यादीमध्ये १८ कंपन्या या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्सचा समावेश आहे. या कंपनीने २८ टक्के नफा कमावला आहे.
सीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्याचे मुख्य कारण म्हणे कंपनी भारतामध्ये लसीची निर्मिती करत असून जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे. एप्रिल २०२० मध्ये पहिल्यांदा कंपनीने ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेकासोबत एकत्र येत कोव्हिशिल्डची निर्मिती केली होती.
सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहाने हॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही गुंतवणूक केली आहे. २००८-०९ आणि २०१५-१६ दरम्यान सीरमचा महसूल २३ टक्कांनी वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहोचला. निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. मात्र सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला.
The Serum Institute of Pharmaceutical companies earned the highest profit in the country
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू काश्मीर सरकारचा कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांना मदतीचा हात, ज्येष्ठांना पेन्शन तर बालकांना शिष्यवृत्ती
- क्वाड गटात सामील झालात तर आपले संबंध खराब होतील, चीनची बांग्लादेशाला धमकी
- गांधी परिवाराशिवाय अध्यक्षासाठी कॉँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच चर्चा
- सचिन वाझेला मुंबई पोलीस सेवेतून डच्चू देण्याखेरीज पर्याय होताच कुठे…??, अनिल देशमुख – अनिल परब जोडगोळीच्या राजकीय बळीचा अँगलही महत्त्वाचा